टॉप बातम्या

स्त्री ही भुतलावरील एक महान शक्ती आहे - मनिषाताई तिरणकर


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
यवतमाळ, (२४ ऑक्टो.) : स्त्री ही भुतलावरील एक महान शक्ति आहे, त्यामुळे तीला आपल्या उध्दारासाठी कोणत्याही देवी देवतेकडू उधार शक्ती घेण्याची कोणतीच गरज नसल्याचे प्रतिप्रादन अ.भा.महिला संवैधानिक हक्क परिषदेच्या राजाध्यक्षा मा. मनीषाताई तिरणकर यांनी राष्ट्र सेविका समिति यवतमाळ, विदर्भ प्रांत द्वारा आयोजित विजयादशमी उत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त होत असतांना केले. 

यवतमाळ येथील विवेकानंद विद्यालयाच्या प्रागंणात हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या मनीषाताई तिरणकर अध्यक्ष होत्या तर, प्रमुख वक्त्या म्हणून मा.गायत्री विप्रदास, प्रांत सह.कार्यवाहीका विदर्भ राष्ट्र सेविका समिति या होत्या. आपले विचार मांडतांना पुढे तिरणकर म्हणाल्या की, विजयादशमी बाबतीत आपण नेहमीच राम रावण युद्ध म्हणजे सत्याचा असत्यावर विजय संबोधून रामाचा आदर्श गुन जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करीत असतो. याला धर्म अधर्माची लढाई सांगून एका विषमतावादी धर्म संस्कृती चा आदर्श मांडण्याचा अट्टाहास धरतो,परंतु हे पुर्ण सत्य नाही. हे सत्य असत्य यातील युद्ध नसून हे दोन संस्कृतीतील अंतरविरोधाचे युद्ध होते. जगात दोन संस्कृती अस्तित्वात आहे. एक संस्कृती जी नैसर्गिक सत्याला विरोध करुन कधीच अस्तित्वात नसणाऱ्या शक्तींना माणून तिचेवर विश्वास करुन जीवन जगण्याचा आग्रह करत असते. ती अतर्कसंगत जैसे थे दांभिक धर्म संस्कृती तर,दुसरी संस्कृती भौतिकवादी सत्याचा स्विकार करुन जगाची पुनर्स्थापित करण्याचा आग्रह धरते व कोणत्याही अदृश्य शक्ति समोर नतमस्तक होण्यास नकार देत अत्त दीप भव म्हणजे स्वयंम प्रकाशित होऊन जगण्याची तर्कसंगत व विज्ञानवादी, भौतिकवादी संस्कृती यातील हा खरा संघर्ष आहे. हे संस्कृतिक वास्तव आपण लक्षात घेतले पाहिजे. या प्रसंगी प्रमुख वक्त्या यांनी ही आपले विचार मांडले. 
या उत्सवाचे प्रास्ताविक ऋचा गढीकर तर, संचालन आणि आभार स्वाती सहस्त्रबुधे यांनी मानले
या उत्सवात असंख्य महिलांनी सहभाग घेतला होता.
Previous Post Next Post