शिक्षिका मालती सेमले ठरली पुरस्कार विजेती

सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२४ ऑक्टो.) : निओडरमिस स्किन, हेअर, लेझर क्लिनिक, मुंबई यांच्या सहयोगाने
घे भरारी साहित्य समूह महाराष्ट्र आयोजित भरारी प्रीमियर लीग ही स्पर्धा सहा साखळी आणि एक महाअंतिम फेरी याप्रमाणे घेण्यात आली होती. या महाअंतिम फेरीचा निकाल नुकताच जाहीर झाला. उपराेक्त महाअंतिम फेरीचे परीक्षक जेष्ठ साहित्यीक चंद्रकांत वानखेडे, डॉ.मारोती कसाब व डॉ.प्रतिभा इंगोले हे होते.

सदरहु स्पर्धेत जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत येत असलेल्या जि.प.उच्च.प्राथ.शाळा मोखाळा येथे कार्यरत शिक्षिका तथा सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या मालती सेमले या सहाही साखळी फेरीत पात्र ठरत महाअंतिम फेरीत पोहोचल्या. तदवतचं महाअंतिम फेरीत त्या तृतीय क्रमांकावर विजयी ठरल्या आहेत.

सेमले यांचे शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातून सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.
शिक्षिका मालती सेमले ठरली पुरस्कार विजेती शिक्षिका मालती सेमले ठरली पुरस्कार विजेती Reviewed by सह्याद्री चौफेर on October 24, 2021 Rating: 5
Powered by Blogger.