सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (२४ ऑक्टो.) : आज सायंकाळी ६ वाजता लक्ष्मीनगर परिसरातील महिला व तरूण कार्यकर्त्यांनी तिरूपती मंगल कार्यालयात काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
या पक्ष प्रवेश सोहळ्यास माजी आमदार वामनराव कासावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उपाध्यक्ष इजहार शेख यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. यावेळी व्यासपीठावर सन्माननीय मोरेश्वर पावडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे,शहर अध्यक्ष प्रमोद निकुरे, तालुका अध्यक्ष प्रमोद वासेकर,जय आबड, ओम ठाकूर, निलेश परगंटीवार, संतोष पारखी, सुनील वरारकर, मंदा बांगडे, वंदना धगडी, मंगला झिलपे,सुर मॅडम, संध्या बोबडे, यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात कासावार यांनी बलिदान दिलेल्या काँग्रेस पक्षाला आपण मजबूत करण्यासाठी या पक्षात प्रवेश केला आहे. सध्या खोटे आश्वसन देवून सत्ता स्थापण करणाऱ्या पक्षाला धडा शिकविण्यासाठी आपण आम्हाला सहकार्य करावे खोटे बोलुन लोकांची फसवणूक करणाऱ्या भाजपा सरकारने बळीराजाच्या पाठीशी उभे राहून त्यांना सहकार्य करण्या ऐवजी त्यांचेवर वाहन चालवून त्यांची हत्या करण्यात आली आहे अशा सरकारला धडा शिकविण्यासाठी आपण आम्हाला सहकार्य करावे अशी विनंती केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश बनसोड यांनी केले तर आभार प्रदर्शन टीकाराम कोंगरे...
शेकडो महिला कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 24, 2021
Rating:
