सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२५ ऑक्टो.) : स्थानिक ताडोबा रोड मेजर गेट जवळील भव्य वास्तु हॉटेल राजवाडा ऐ वेडींग पॅलेसचे उद्घाटन चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे हस्ते शनिवार दिनांक 23 ऑक्टोंबरला सायंकाळी पार पाडले. या कार्यक्रमाला प्रामुख्याने चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे उपस्थित होते.
प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले . त्यानंतर मावळे ग्रुप व फॅमिलीचे मुख्य अतुल मावळे व मेघा मावळे यांनी उद्घाटक व प्रमुख अतिथी यांचा शाल श्रीफल व मोमेंटो देऊन सत्कार केला.
तदवतंच उपस्थित पाहुण्यांनी अतुल मावळे यांचे वयोवृद्ध वडील वासुदेवराव मावळे व त्याची आई सुमनताई मावळे व्यवसायी दर्यापूर यांचे शाल व श्रीफळ देऊन या वेळी सत्कार केला, अशोक बिहाडे व पुलगाव डिफेन्सचे सेवानिवृत्त अधिकारी रमेश ददगाल यांनी मावळे ग्रुपचे अतुल मावळे मेघाताई मावळे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला,तसेच राजवाडा हॉटेल व वेडींग पॅलेसला सूंदर रूप देऊन सजविणारे मुंबईचे अभियंता मेहुलजी दवे यांचा शाल श्रीफळ देऊन अतुल मावळे यांनी त्यांचा सत्कार केला,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश ददगाल यांनी केले.
विदर्भामध्ये मावळे ग्रुप हे गरिबांना रोजगार देण्याकरिता किती मोलाचे कार्य करीत आहे या विषयी त्यांनी पाहुण्यांना माहिती दिली,ते म्हणाले की ह्या विदर्भामध्ये सवकलाल मंडळातील अनेक सदस्यांनी व मावळे ग्रुपनी 400 ते 450 गरीब लोकांना रोजगार मिळवुन दिला तसेच ह्या संघटनेचे अनेक व्यवसायिक रोजगार उपलब्ध करीत आहे,
सत्काराला उत्तर देताना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने पोलीस अधीक्षक साळवे व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी मावळे ग्रुपचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, चंद्रपूर शहरामध्ये सुंदर अशी राजवाडा पॅलेसची निर्मिती करून जनतेच्या सेवेकरिता बहाल करून गरीब लोकांना रोजगार देण्याचे कार्य मावळे ग्रुप करीत आहे. ह्या समाज संघटनेकडून असेच समाज कार्य घडत राहो अशी आशा त्यांनी या वेळी आपल्या बाेलण्यातुन व्यक्त केली.
उपराेक्त कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता चंद्रपूर येथील चंद्रपूर जिल्हा कलाल संघटनेचे सचिव अशोक बिहाडे,व एकता काळे यांनी मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमाचे संचालन मुक्ता बोधावार यांनी केले तर नंदा बिहाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
हॉटेल राजवाडा ऐ वेडिंग पॅलेस जनतेच्या सेवेत - थाटात उद्घाटन साेहळा पार पडला
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 25, 2021
Rating:
