सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (२५ ऑक्टो.) : आई वडिलांच्या भांडणात मध्यस्ती का केली नाही एवढ्याशा शुल्लक कारणावरून वडिलांनी मुलाशी वाद घालत त्याचा हात पिरगाळून त्याला जखमी केल्याची घटना रवीनगर येथे घडली. त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याच्या हाताचं हाड तुटल्याचं निदान दिल्यानंतर मुलाने वडिलांविरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. पोलिसांनी मुलाच्या तक्रारी वरून वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील रविनगर येथे वास्तव्यास असलेल्या कुटुंबातील पती पत्नीमध्ये कडाक्याचं भांडण झालं. गजानन मारोती मेश्राम (४९) यांचा त्यांच्या पत्नीशी घरगुती कारणावरून वाद सुरु होता. आई वडिलांच्या भांडणात घरातील जबाबदार व्यक्ती म्हणून मुलाने मध्यस्ती करावी अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु आई वडिलांच्या घरगुती वादात मुलाने लक्ष घालणे टाळले. त्याने आई वडिलांचा सुरु असलेला वाद गांभीर्याने घेतला नाही. ही बाब वडिलांना खटकली. घरातील जबाबदार मुलगा म्हणून आई वडिलांचा वाद शमविण्यास मध्यस्थी का केली नाही, म्हणून वडिलांनी मुलाशीच वाद घालत त्याचा ताकतीनिशी हात पिरगाळला. त्याला घरून निघून जाण्याची तंबी दिली. हातात चांगलच दुखणं भरल्याने मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्याच्या हाताचं हाड तुटल्याचं निदान दिलं. त्यानंतर त्याने गजानन मेश्राम या आपल्या वडिलांविरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. आदित्य गजानन मेश्राम (२१) याच्या तक्रारी वरून पोलिसांनी वडिलांवर भादंवि च्या कलम ३२५, ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलिस करित आहे.
पती पत्नीचा सुरु होता वाद, मध्यस्थी न करणाऱ्या मुलाचा वडिलांनी मोडला हात !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 25, 2021
Rating:
