सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२५ ऑक्टो.) : गेली दोन वर्ष सतत महाभयानक कोरोना काळात गेली याच कालावधीत सर्व मुलांचे शिक्षण बंद अवस्थेत होते. त्यामुळे साहजिकच विविध प्रकारचे आवश्यक दाखले घेणे बंद अवस्थेमध्ये होते. परंतु आज सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू झाले आहे. त्यामुळे प्रत्येकाला आज शाळेत प्रवेश घेण्यासाठी शासकीय दाखले (लाेकांना व विद्यार्थ्यांना) हवे आहेत. नान क्रिमिनल, उत्पन्न, जातीचे प्रमाणपत्रे काढण्यासाठी हवे असणारे कागदपत्रे सेतु मधून मिळण्यास विद्यार्थ्यांना बराच त्रास सहन करावा लागत आहे. त्यांना वेळेवर काम सोडून तहसील कडे आणि कॉम्पुटर रुम कडे जावे लागत आहे. इतकेच नाहीतर सदरहु दाखले मिळण्यास 15 ते 20 दिवसांचा कालावधी लागत आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही या करिता त्यांना वेळेत दाखले मिळावे जेणेकरून विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी त्रास होणार नाही अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.
दरम्यान, नेरी येथील विलास मेहरकुरे यांनी उपरोक्त परिस्थिती वरिष्ठ अधिका-यांच्या निदर्शनास नुकतीच आणून दिली आहे. प्रशासनाने या कडे लक्ष पुरवून विद्यार्थ्यांची हाेणारी गैरसाेय टाळावी.
चिमूर : दाखले मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना करावी लागते तारेवरची कसरत !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 25, 2021
Rating:
