फेफरवाडा शेतशिवारात डुकरांचा धुमाकूळ

सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मार्डी, (३ ऑक्टो.) : येथून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या मच्छिन्द्रा ते फेफरवाडा शेत शिवारात सीमा कुमरे यांच्या शेतात डुकराने धिंगाणा केला असून, या डुकरांच्या नासधूस मुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. वनविभागाने झालेल्या मालाच्या नुकसानी ची आर्थिक मदत मिळावी असे मत या महिला शेतकऱ्याने बोलून दाखवले. या डुकराच्या धिंगाण्यामुळे शेत मालाची नासधूस झाल्याचे त्यांनी सांगितले.
शासनाने, वनविभागाने आम्हा शेतकऱ्यांना शेती कुंपणे, जाळी कुंपण करून द्यावी अशी मागणी होत असून, या नासधूस ने आम्हा शेतकऱ्याचं खूप नुकसान होत आहे. हातात आलेला पिक हे या डुकराच्या धिंगाणेने आमचा हाती आलेला माल गमावले गेला असे दुःख व्यक्त केले.शासनाने या डुकरांची, वराची विल्हेवाट लावावी अशी मागणी महिला शेतकरी सीमा कुमरे यांच्याकडून होत आहे.
फेफरवाडा शेतशिवारात डुकरांचा धुमाकूळ फेफरवाडा शेतशिवारात डुकरांचा धुमाकूळ Reviewed by सह्याद्री चौफेर on October 03, 2021 Rating: 5
Powered by Blogger.