सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार
केळापूर, (३ ऑक्टो.) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कार्यरत असलेले रोजगार सेवकांना ग्रामपंचायत सेवेत कायम करण्यात यावे. या प्रमुख मागणीचे निवेदन दिनांक 23/09/2021 ला तहसीलदार यांच्या सह वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. अन्यथा येत्या दोन आक्टोबर गांधी जयंती दिनी लक्षणिक उपोषण करण्यात येईल असा इशाराही महाराष्ट्र ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य तालुका शाखा पांढरकवडा वतीने देण्यात आला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीत रोजगार सेवकांची महत्वाची भुमिका असताना तुटपुंज्या मानधनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत आहे.गावाच्या विकासासह बेरोजगारांना काम उपलब्ध करून देण्यात रोजगार सेवक जबाबदारीने कर्तव्य पार पाडत आहे. मात्र, त्यांना स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला बळी पडावे लागत आहे. मनमानीला बळी न पडता कामे केल्यास त्यांना कामावरुन काढून टाकण्याचा घाट घातला जातो. अशावेळी प्रशासनाने शासन निर्णयानुसार अंमलबजावणी करावी, राजकिय दडपणाखाली कारवाई करु नये, रोजगार सेवकांच्या तक्रारीची चौकशी करून त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी द्यावी, राजकीय सुडबुध्दीने बेकायदेशीर रित्या रोजगार सेवकांना काढुन टाकण्याची कारवाई करण्यात येवु नये, तसेच राज्यातील २८ हजार १४४ रोजागार सेवकांना ग्रामपंचायत सेवेत कायम करावे अशा आशयाची मागणी करणारे निवेदन महाराष्ट्र ग्रामपंचायत ग्राम रोजगार सेवक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य तालुका शाखा पांढरकवडा यांनी पांढरकवडा तहसीलदार सुरेश कव्हडे यांच्या मार्फत वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविले आहे.
यावेळी ग्राम रोजगार संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष रामदास राठोड, पुनाजी मडावी, लक्ष्मण आरेवार, विलास चांदुरकर, देवराव राऊत, गणेश सिडाम, विनोद वाहिले, देविदास चव्हाण, धरमसिंग पराचे, भारत पेंदोर, ध्यानेश्वर चोधरी, हिरामण राठोड, शंकर राठोड, विनोद किनाके, खुशाल येडमे, राजू आडे, रमेश पालेपवार आदी 2 तारखेला तहसील कार्यालय समोर उपोषण ठिकाणी उपस्थित होते.
केळापुर तालुक्यातील रोजगार सेवकाचे पांढरकवड्यात धरणे आंदोलन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 03, 2021
Rating:
