सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे
वरोरा, (३ ऑक्टो.) : इनरव्हील क्लब वरोरा या सामाजिक कार्य करण्यात अग्रेसर असणाऱ्या संस्थेमार्फत महिलांकरिता अगदी वेगळ्या विषयावर परिसंवाद / कार्यशाळा दिनांक 01 ऑक्टोबर 2021 रोजी आयोजित करण्यात आलेली होती. "मेकअप आणि स्किन ट्रिटमेंट " असे या नावीन्यपूर्ण कार्यशाळेचे नाव असून फक्त महिलांकरीता "स्त्री सक्षमीकरण" प्रकल्पाच्या अंतर्गत महिलांना रोजगार उपलब्ध करून आत्मनिर्भर करण्याचा
प्रयत्न या उपक्रमात केलेला दिसून येतो.
जेणेकरून महिला स्वतःच्या घरातूनच वेगवेगळ्या पद्धतीने उद्योग व व्यवसाय करून स्वतःचे जीवनमान उंचावून सशक्त बनू शकतात.
इनरव्हील क्लबच्या "मेकअप आणि स्किन ट्रिटमेंट" या कार्यक्रमात विस्टेज प्रा. लि. च्या वैशाली पद्मावर यांनी अत्यंत मोलाची मदत केलेली असून प्रमुख पाहुणे म्हणून भावना जोशी मॅडम (विस्टेज प्रा. लि. च्या अग्रणी सदस्या) उपस्थित होत्या. सेमिनार सृष्टी ब्युटी पार्लर (वृषाली जोगी) वरोरा येथे दिनांक 01 ऑक्टोबर 2021 ला यशस्वीपणे पूर्ण झाले.
या सेमिनारचे प्रायोजक विस्टेज प्रा. लि. असून विशेष म्हणजे 160 गरजू महिलांनीही या
कार्यशाळेचा लाभ घेतलेला आहे. इनरव्हील क्लबतर्फे 18 सदस्यांची टीम होती.
इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा मधु जाजू, सेक्रेटरी वंदना बोढे, सुचेता पद्मावार, झेनब सिद्धीकोट, स्नेहल पत्तीवार, दीपाली माटे, प्राजक्ता कोहळे, मानसी चिकनकर, हर्षदा कोहळे, आभा सायरे, निलिमा गुंडावार, पूजा गोठी सहित इतर अन्य सदस्य उपस्थित होत्या.
"इनरव्हील क्लबचा महिलांकरिता नावीन्यपूर्ण उपक्रम"
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 03, 2021
Rating:
