शहीद भगतसिंग क्रीडा मंडळ पांढरकवडा यांच्या वतीने राष्ट्रपीता महात्मा गांधी यांची 152 वी जयंती साजरी करून स्मारकास अभीवादन
सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार
केळापूर, (३ ऑक्टो.) : देशाला ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त करण्यात सर्वात महत्वाची भूमिका बजावणारे, सत्य आणि अहिंसेच्या तत्त्वाच्या आधारावर ब्रिटिशांना अनेक वेळा गुडघे टेकण्यास भाग पाडणारे असे राष्ट्रपीता महात्मा गांधी. आज 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीनिमित्त शहीद भगतसिंग क्रीडा मंडळ पांढरकवडा च्या वतीने माल्यार्पण करून जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात पांढरकवडा शहरातील नामवंत विधितज्ञ अॅडवोकेट खैरकार साहेब यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. व.न.प.पांढरकवडा नगरसेवक पवनभाऊ कुडमथे यांची प्रमुख ऊपस्थीती होती.
यावेळेस मंडळाचे मार्गदर्शक शामजी राठोड, विरेंद्र बैस, अक्रम अली, गुरूबचनसींग जुनी लखन मेश्राम, अनस काझी, अर्जुनसींग, साजीद शेख, कौसरभाई, नेहरू युवा केंद्र पांढरकवडा तालुका स्वयंसेवक विशाल दुबे व शहीद भगतसिंग क्रीडा मंडळाचे सर्व पदाधीकारी व खेळाडू उपस्थित होते.
शहीद भगतसिंग क्रीडा मंडळ पांढरकवडा यांच्या वतीने राष्ट्रपीता महात्मा गांधी यांची 152 वी जयंती साजरी करून स्मारकास अभीवादन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 03, 2021
Rating:
