देवाळा येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (३ ऑक्टो.) : ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ असं म्हटलं जातं. कोरोनाच्या आपत्ती काळातील ही गरज ओळखून शिवशक्ती गणेश उत्सव मंडळाने  पुढाकार घेत रक्तदान शिबिराचे (Blood Donation) आयोजन केले आहे. शिवशक्ती गणेश उत्सव मंडळ देवाळा व लाईफ लाईन ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर दि. ०२ ऑक्टोंबर २०२१ रोज शनिवारला देवाळा येथील प्रार्थना मंदिरात संपन्न झाला.
या शिबिराचे मार्गदर्शक म्हणून डॉ. महेंद्रजी लोढा हे होते. तर ब्लड बँक टीम नागपूर येथील 
सचिन दडवे, हरीश ठाकूर, वैभव बाराहाते, विशाल घोडेश्वर, कोमल बाराहाते यांनी रक्तदान शिबीरात सहभागी झालेल्या 26 रक्तदात्यांचा रक्त पुरवठा संकलित केला.

यावेळी रक्तदाते सुमित जुनगरी, पितांबर देवाळकर, ऋतिक निमकर, संदीप बोकडे, अमित सावरकर, नितीन निखाडे, आकाश मत्ते, राहुल गानफाडे, अतुल गांजरे, संजय देवाळकर, महेश बुरडकर, सचिन बोकडे, मारोती निखाडे, प्रफुल देउळकर, सुरज मत्ते, गजानन मत्ते, उमेश निखाडे, उज्वल बोधे, मारोती बोकडे, अमित देवाळकर, सुबोध गांजरे, दत्तात्रय खोके, अविनाश ढवस, सुभाष बोढे, कुणाल सोमनकर आदींनी रक्तदान केले.

या भव्य रक्तदान शिबीर कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आयोजक, शिवशक्ती गणेश उत्सव मंडळ यांनी विशेष सहभाग घेतला असून, धनंजय बोधाने, गणेश बुरडकर, आकाश गाणफाडे, आशिष गाणफाडे, प्रकाश बुरडकर, कार्तिक निखाडे, आकाश बोकडे, राकेश रोगे, अजय गजबे, पवन बोढे, विवेक बोकडे, गणेश कोयचाडे, अजय निखाडे, व देवाळा ग्रामवासी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी शिवशक्ती गणेश उत्सव मंडळातर्फे शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांचे आभार मानले.
देवाळा येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न देवाळा येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on October 03, 2021 Rating: 5
Powered by Blogger.