आई ची माया

आईची माया

सदा व्याकूळ
आईची माया
असे अढळ
प्रेमळ छाया ||१||

सोसले तिने
टाकीचे घाव
घेई सर्वांच्या
मनाचा ठाव ||२||

कधीच तिला
विश्रांती नसे
नित्य कामात
दिसत असे ||३||

सदा म्हणते
जपुनी बाळ 
राहा कुठेही
तुटे ना नाळ ||४||

नका विसरु
 मातेचे ऋण
 करण्या सेवा
 बांधा कंकण ||५||
डॉ. स्मिता निशिकांत मेहेत्रे, नागपूर
मो.नं.-९८२३४१४८६५
सदस्या - सहज सुचलं काव्यकुंज
आई ची माया आई ची माया Reviewed by सह्याद्री चौफेर on October 03, 2021 Rating: 5
Powered by Blogger.