मातृत्वाचा सन्मान: जगी तिची किर्ती


आई म्हणजे वात्सल्य
ज्ञान वैराग्याची मूर्ती
नाही तसे हो दैवत 
 जिची जगी असे किर्ती ||१||

बाळ हाक मारी आई 
माता सृजन सामर्थ्य 
सेवा तिची करूनिया 
सर्व साधा परमार्थ ||२||
 
शिवबाची जिजामाता
देई स्वराज्याचे धडे 
शान राखण्या राज्याची 
जिंकी गडावर गडे ||३||
 
ज्ञानसूर्य जोतीराव 
घडविले सावित्रीने 
केला उद्धार स्त्रियांचा
जपे अनाथा मायेने ||४||
  
क्रांतीसुर्य भीमराव 
शिल्पकार भारताचे 
त्याग करता रमाई 
बाप झाले जनतेचे ||५||

असे जो आईजवळी
त्याला मिळे हो सर्वस्व
ज्याची आई वृद्धाश्रमी
त्याचे मिटती वर्चस्व ||६||
डॉ. स्मिता निशिकांत मेहेत्रे, अयोध्यानगर,नागपूर
सदस्या - सहज सुचलं काव्यकुंज
मो.नं.- ९८२३४१४८६५
मातृत्वाचा सन्मान: जगी तिची किर्ती  मातृत्वाचा सन्मान:  जगी तिची किर्ती Reviewed by सह्याद्री चौफेर on October 03, 2021 Rating: 5
Powered by Blogger.