"बापू ,पुन्हा तुम्ही यावे! "


                 बापू ,पुन्हा तुम्ही यावे! 

सत्याग्रह आणि अहिंसा 
या शस्त्रांना घेवुनी यावे 
या शस्त्रांचे शास्त्र सांगण्यास 
बापू , पुन्हा तुम्ही यावे ॥ 

जिकडेतिकडे सुसाट वारे 
आहेत सारी दिशाहीन 
ह्या वाऱ्यांना दिशा द्यायला 
बापू , पुन्हा तुम्ही यावे ॥ 

ज्या मानवतेला दिला आधार 
ती अजुनही जातीच्या बंधनात 
त्या जातीची बंधने तोडायला 
बापू , पुन्हा तुम्ही यावे ॥ 

तुम्ही सांगून गेले , स्त्री मातेसमान 
पण , कित्येक निर्भया जातात बळी 
त्या निर्भयांना न्याय द्यायला 
बापू , पुन्हा तुम्ही यावे ॥ 

खुर्चीसाठी सारे काही 
देशासाठी काही नाही 
विचारावे तुम्ही या नेत्यांना 
बापू , पुन्हा तुम्ही यावे ॥ 

वाट पहाती सारे 
मोकळा श्वास घेण्यास 
कोंडलेल्या श्वास मुक्त करण्यास 
बापू , पुन्हा तुम्ही यावे ॥ 


सौ.मेघा सुरेश भांडारकर 
गिरोला, भंडारा 
स .क्र .०४३
"बापू ,पुन्हा तुम्ही यावे! " "बापू ,पुन्हा तुम्ही यावे! " Reviewed by सह्याद्री चौफेर on October 03, 2021 Rating: 5
Powered by Blogger.