सह्याद्री न्यूज | रवी वल्लमवार
पांढरकवडा, (३ ऑक्टो.) : २ ऑक्टोम्बर २०२१ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ८ वाजता गुरुदेव सेवा मंडळ पांढरकवडा, यांचे द्वारा भजन व ध्यान साधना आणि पथ नाट्याला संगीतमय साथ देण्यात आली. त्यात प्रामुख्याने विलास गोडे, प्रभाकर ठाकरे, बादशाह,पोतराजवार साहेब, राठोड बंधु आणि इतर गुरुदेव प्रेमींनी मोलाची साथ दिली.
कार्यक्रम विधि सेवा समिती,नगर परिषद आणि वकील संघ केळापुर यांचे सायक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. आणि यशस्वीतेकरिता मुख्याधिकारी श्री.राजु मोट्टेमवार साहेब, नगराध्यक्ष सौ.वैशाली नहाते मैडम, श्री.आंम्बटकर साहेब, श्री.संतोष व्यास.आणी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. जिल्हा न्यायाधीश श्रीमान ॲड नाईकवाड साहेब.दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश श्री.ॲड बुदरुक साहेब.श्री.ॲड नहार साहेब.तथा सर्व कर्मचारी वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे यशस्वितेकरिता वकील संघाचे मोलाचे सहकार्य लाभले. श्री. ॲड मुत्यालवार साहेब, श्री.ॲड देशमुख साहेब, सौ.ॲड लोढ़ा मैड़म, सौ. ॲड जयसवाल मैडम, श्री.ॲड पेटेवार साहेब, श्री.ॲड जी.व्ही.बिजेवार साहेब,श्री.ॲड मानकर साहेब, सौ.गुंडावार मैडम, श्री.ॲड शेन्डे साहेब, श्री. ॲड चौधरी साहेब, श्री.ॲड मोरे साहेब, श्री.ॲड पवार साहेब तसेच बहुसंख्य वकील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन ॲड जी.व्ही.बिजेवार साहेब सचिव केळापूर वकील संघ,तर आभार प्रदर्शन ॲड पेटेवार साहेब यांनी केले. मंचावर जिल्हा न्यायाधीश श्री.ॲड नाइकवाड साहेब कार्यक्रमांचे अध्यक्ष म्हणून होते तर अँड मानकर साहेब,तसेच मुख्याधिकारी श्री.राजुजी मोट्टेमवार, ॲड देशमुख साहेब, तहसीलदार श्री सुरेश कव्हले, नगराध्यक्षा सौ. वैशाली नहाते मैडम तथा वकील संघाचे अध्यक्ष ॲड खैरकार साहेब उपस्थित होते.
श्री.देशमुख साहेब यांनी हिन्दू वारसा कायदा श्री.राजू मोट्टेमवार साहेब यांनी शासकीय योजना यावर माहिती दिली आणि जिल्हा न्यायाधीश श्री.नाईकवाड साहेब यांनी अध्यक्षीय भाषण केले.
कार्यक्रमची सुरुवात पूज्यनीय बापूच्या प्रतिमेला माल्यार्पण करुण तथा हुतात्मा स्तंभला "पुष्प चक्र" अर्पण करण्यात आले.
संपुर्ण कार्यक्रमात गुरुदेव सेवा मंडळाच्या सदाबहार भजनाने वातावरण आध्यात्मिक स्वरूपाचे झाले होते.
जिल्हा न्यायालय केळापुर येथे महात्मा गांधी तथा लालबहादुर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 03, 2021
Rating:
