सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (३ ऑक्टो.) : ज्ञानार्चना दिव्यांग महिलाश्रयात इनरव्हील क्लब ऑफ चांदा फोर्ट तर्फे दंत चिकित्सा शिबीर नुकतेच घेण्यात आले. या शिबिरात दिव्यांग मुलींची तज्ञ डॉ.शितल बुक्कावार यांनी चिकित्सा केली. शिवाय सर्वोत्कृष्ट निरोगी दंतपंक्ती असलेल्या मुलीला बक्षिस देऊन गौरविण्यात आले. त्यात कु. मोनिका मोहुर्ले हिने हे पारिताेषिक पटकाविले.
सदरहु कार्यक्रमासाठी इनर विल क्लब ऑफ चांदा फोर्ट तर्फे प्रेसिडेंट डॉ. शीतल बुक्कावार सेक्रेटरी सोनल बुक्कावार, वाॅईस प्रेसिडेंट अंजली दुड्डालवार, प्रोजेक्ट डायरेक्टर्स माधवी कांचर्लावार, राधा उपगंलावार, सीसी अश्विनी राघुशे श्रुती कुकडे, स्वाती बेट्टावार, वैशाली अहीरकर, वैशाली पालार्पवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. डाॅ.शितल बुक्कावार यांनी दातांचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी काय करावे याबाबत माेलाचे मार्गदर्शन केले.
संस्थेच्या संचालिका अर्चना मानलवार भोयर यांनी कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितीतांचे आभार मानले शिबिराला अनेकांची उपस्थिती लाभली हाेती.
चंद्रपूरात दंत शिबिराचे आयोजन - अनेकांची उपस्थिती
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 03, 2021
Rating:
