चालबर्डी येथे राष्ट्रपिता मा.गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
पांढरकवडा, (३ ऑक्टो.) : चालबर्डी येथे सार्वजनिक वाचनलय कक्षेमध्ये दि. २ आक्टोबर रोजी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने चालबर्डी येथे भव्य भजन सुगम संगीताचे आयोजन करण्यात आले. महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांच्या स्वातंत्र्याची एक आठवण म्हणून भजन मैहफीलच्या माध्यमातुन करण्यात आले. भजनाच्या तालावर चालबर्डी येथे आध्यत्मिक वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याकरिता अनेक गुरुदेव प्रेमी यांनी कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली. गुरुदेव सेवा भजन मंडळ समस्त सदस्यगण श्री. व्‍यंकटी तोटावार, तुकाराम नेहारे, विश्वास सिडाम, रमेश पोलकमवर, देविदास चव्हाण, दत्तु करमनवार, दत्तु नादेडपवार, छत्रु तुरणकर, येलन्ना रोडावर, हुशन्ना मोलगुलवार, विजय गुरनुले, भास्कर कुंचलवार, बंडू मडावी, गंगाराम कुर्रेवार, घनश्याम सिडाम, किसन नेहारे, कवेश्वर कुमरे, रवि वल्लमवार ग्रामपंचायत, कर्मचारी शंकर मग्गीडवार यांच्या सहकार्याने व गावकऱ्यांच्या उपस्थिती ने कार्यक्रम पार पडला.
चालबर्डी येथे राष्ट्रपिता मा.गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी चालबर्डी येथे राष्ट्रपिता मा.गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी Reviewed by सह्याद्री चौफेर on October 02, 2021 Rating: 5
Powered by Blogger.