स्पर्धा परीक्षा- वयोमर्यादा ओलांडल्याने हजारों विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात - राजु झाेडे

सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (८ ऑक्टो.) : कोरोना आणि मराठा आरक्षणामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि सरळसेवा भरतीच्या जाहिराती न मिळाल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणांऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी वयोमर्यादा ओलांडल्याने त्यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न भंगण्याच्या वाटेवर आहे.अश्या विद्यार्थ्यांना वयोमर्यादेत सूट देण्याच्या आश्वासनाच्या सरकारला विसर पडला आहे त्यामुळे आता वयोमर्यादा म्हणजे सुट नाही तर प्रत्येक विभागातील परीक्षेच्या दोन वाढीव संधी देण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडी करत आहे कोरोणामुळे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील रिक्त पदांमुळे पूर्व मुख्य परीक्षा आणि मुलाखती होऊनही निकाल प्रलंबित राहिला त्यातच मराठा समाजाचे एसईबीसी आरक्षण रद्द झाल्याने पेच निर्माण झाला आणि राज्य सरकारच्या निर्णयानुसार निकालात फेरबदल करावा लागला दोन वर्षे निघून गेली निकालाच्या प्रतीक्षेतील स्वप्निल लोणकरने कंटाळून आत्महत्या केली. त्यानंतर एमपीएससीच्या सर्व जागा भरल्या जातील आयोगामार्फत मोठी पदभरती होईल असे बातम्या प्रसारित झाल्या परंतु 31 जुलै, 31 सप्टेंबर ही निघून गेला मात्र कारवाई झालेच नाही. दुसरीकडे उमेदवारांना परीक्षेच्या सहा संधी देण्याच्या निर्णय मात्र लागू करण्यात आला परंतु कोरोनाच्या संकटात दोन वर्षं परीक्षा न झाल्याने वयोमर्यादा संपलेल्या उमेदवारांना वाढीव संधी दिली जाईल अशी ग्वाही सरकारने दिली मात्र भविष्यात भावी अधिकारी होणाऱ्या तरुणाच्या पदरी निराशाच पडली आहे, कारण दिनांक 4 तारखेला प्रसिद्ध झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 290 पदाची राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात काढले यामध्ये कुठेही वयोमर्यादा वाढवून मिळालेली नाही दोन वर्षे प्रतीक्षा करून फक्त 290 जागा दिल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.
2 वर्षे प्रतीक्षा नंतर ही संख्या जास्त असणे गरजेचे होते परंतु सरकारने दिलेले आश्वासन ही साफ फोल ठरले. एमपीएससीने नवी प्रणाली तयार केल्यानंतर जुन्या संकेत स्थळावरील खाते अद्यावत करण्यात उमेदवारांच्या गोंधळ होत असल्याचे दिसून येत आहे. संकेत स्थळावरील बारा लाखापैकी जनतेने एक लाख खाते अद्यावत झाल्याची माहिती समोर आली आहे खाते अद्यावत करताना नवीन खाते तयार झाले पासवर्ड बदलूनही जुने खाते दिसत नाही, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल बंद असल्याने खाते अद्यावत करण्यासाठी काय करावे याबाबत आयोगाने स्पष्ट करावे. कोरोना किंवा मराठा आरक्षणामुळे भरती प्रक्रिया रखडल्या मध्ये या विद्यार्थ्यांचा काहीच दोष नाही मात्र तरीही अनेक वर्षे परीक्षेची तयारी करणारे या विद्यार्थ्यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न भंगणार आहे. अनेकांची एक ते दोन दिवसांच्या फरकाने वर्षाची संधी हूकत आहे त्यामुळे शासनाने वयोमर्यादेची अट शिथिल करण्याऐवजी कोरोनाकाळात जाहिराती न आल्याने वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दोन संधी द्यावा अशी मागणीचे सरकारने व आयोगाने गॅझेट नोटिफिकेशन काढून प्रसिद्ध करावे ही प्रमुख मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे युवक आघाडीचे सिद्धांत पुणेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे उपजिल्हाधिकारी द्वारा एका निवेदनात द्वारे मुख्यमंत्र्याकडे केली. निवेदन देताना प्रथम दुपारे, उदय भगत, स्वप्निल सोनटक्के, सचिन ठीपे, विशाल जाधव आदी उपस्थित होते.
स्पर्धा परीक्षा- वयोमर्यादा ओलांडल्याने हजारों विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात - राजु झाेडे स्पर्धा परीक्षा- वयोमर्यादा ओलांडल्याने हजारों विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात - राजु झाेडे Reviewed by सह्याद्री चौफेर on October 08, 2021 Rating: 5
Powered by Blogger.