सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (८ ऑक्टो.) : येत्या रविवार दि. १० ऑक्टोंबरला महाराष्ट्रातील ३६ जिल्हयात राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रणीत प्राध्यापक,शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी विंग तर्फे अधिवेशन होत आहे, चंद्रपुर जिल्ह्यात सुद्धा जेष्ठ सेवा नागरिक संघ रामनगर येथील सभागृहात सदरहु अधिवेशन सकाळी 11:30 ते ४ वाजेपर्यंत होणार आहे. या अधिवेशनाला उद्घाटक म्हणून डॉ. प्रमोद शंभरकर सचिव डॉ. बाबासाहेब आंबेडकर टीचर असोसिएशन गोंडवाना विद्यापीठ हे उपस्थित राहणार असून,या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. सुभाष सोमकुंवर नागपुर प्रोटान विभाग अध्यक्ष, नागपुर हे विभूषित करणार आहे.
अधिवेशनात खालील विषयावर सखोल चर्चा, मार्गदर्शन होणार आहे. DCPS/NPS धोरणाचे प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याच्या भविष्यावर होणारे गंभीर दुष्परिणाम, त्यांची कारणे व उपाय- एक मंथन नवीन शैक्षणिक धोरण 2020 आणि (१ ऑक्टो.) २०२१ पासून सर्व कर्मचाऱ्याच्या कामाचे तास ८ ऐवजी १२ करणाऱ्यां सुधारित कामगार कायद्याचे बहुजन समाजावर होणारे परिणाम - एक गंभीर चर्चा प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याच्या वर्तमान व भविष्यकालीन समस्याच्या समाधानाकरीता RMBKS - PROTAN संघटनेची भूमिका यावर प्रमुख वक़्ते म्हणून सुनील दुधे जिल्हा जूनी पेंशन हक्क संघटना, संजय कांबळे कोल माइन्स, नरेंद्र कन्नाके महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त, प्रा.अनिल डहाके भवानजीबाई चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय, प्रा. चंद्रकांत खंगार आठवले समाजकार्य कॉलेज चिमूर, मनोहर बांदरे प्रोटान जिल्हा अध्यक्ष आदीं मान्यवर या अधिवेशनात मार्गदर्शन करणार आहेत. याच अधिवेशनात प्रोटान नागपुर विभाग तर्फ राष्ट्रपिता ज्योतिराव फुले गुणवंत सत्यशोधक पुरस्कार प्राप्त धनराज दुर्योधन आणि क्रांतिज्योति सावित्रीमाई फुले गुणवंत सत्यशोधिका पुरस्कार प्राप्त मीनाक्षी राऊत यांचा ही सत्कार जिल्हा प्रोटान कार्यकारणी तर्फे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन होणार आहे.
उपराेक्त अधिवेशनाला जिल्हयातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, इतर विभागातील कर्मचारी, पालक, विद्यार्थी, महिलांनी उपस्थित राहून ठेवलेल्या विषयाचे गांभीर्य जाणून घेत जागृत राहावे असे आवाहन प्रा.सुचिता खोब्रागडे प्रोटान कार्याध्यक्षा महाराष्ट्र राज्य, मनोहर बांदरे प्रोटान जिल्हाध्यक्ष, प्रा .कविता चंदनखेड़े उपाध्यक्ष RMBKS महाराष्ट्र राज्य, अशोक तुमराम RMBKS जिल्हाध्यक्ष, धनराज गेडाम महासचिव व इतर RMBKS प्रोटान जिल्हा कार्यकारणीने एका प्रसिध्द पत्रकातुन केले आहे.
प्रोटान संघटनचे जिल्हास्तरीय अधिवेशन येत्या १० ऑक्टाेबरला चंद्रपूरात!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 08, 2021
Rating:
