टॉप बातम्या

उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा येथे PSA ऑक्सिजन प्लांट चे उद्घघाटन

सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
पांढरकवडा, (८ ऑक्टो.) : दि. ०७-१०-२०२१ रोजी केळापुर आर्णी विधासभेचे आमदार डॉ संदिप धुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले 
हवेतून नैसर्गिक पद्धतीने ऑक्सिजन वेगळे करुन रुग्णास शुद्ध ऑक्सिजन पुरवठा करणे हे उद्देश आहे. सदर प्लांटमुळे कोवीड १९ रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
PSA Preasure Swing Absorption हे प्लांट पीएम केअर फंडामधुन NHI यांच्या सहकार्याने उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा येथे बसविण्यात आले आहे. या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून किशोर तिवारी अध्यक्ष शेतकरी स्वालंबन मिशन (राज्यमंत्री दर्जा), वैशाली नहाते नगराध्यक्ष यांचे उपस्थिती होते.


या प्लांट करीता मार्गदर्शन करणारे डॉ. तरंगतुषार वारे जिल्हा सल्य चिकित्सक, डॉ. वैशाली सातुरवार वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा, संजय तोडासे वैद्यकीय अधिकारी, डॉ. रमा बाजोरीया, वैद्यकीय अधीकारी, व या प्लांट करीता सहकार्य करणारे रुग्णालयातील डॉ. वानखडे, डॉ.
 प्रतिभा तोडासे , डॉ. निपाने, डॉ. किनाके, डॉ. नैताम, व कर्मचारी विनोद जाधव, प्रकाश कायपेल्लीवार, रुग्णसेवक. ऋत्विक पाटील, श्रीमती चंन्द्रकला कातोरे, राजश्री बाबले, नंदा मंडलवार, संतोष लोहार, अक्षय बिजेवार, रोशन मालखेडे, रोहीणी भगत,चांदेकर, वैशाली बावणे, विजया तोडसाम, सलीम देशमुख, सोयाम,कांचन चव्हाण, व उपजिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱी उपस्थित होते.
Previous Post Next Post