सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
उमरखेड, (८ ऑक्टो.) : उमरखेड तालुक्यातील टाकळी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पिंपळवाडी तांडा येथील मजूर आदिलाबाद येथे काम करण्यासाठी गेले असता दिनांक 31 ऑगस्ट रोजी वीज पडून मृत्यू पावलेल्या संगीता जाधव यांच्या कुटुंबीयांना उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार नामदेव ससाने व उमरखेड तहसील चे कर्तव्यदक्ष तहसीलदार आनंद देऊळगावकर यांच्या हस्ते दि. ८ ऑक्टोंबर रोजी आर्थिक मदत म्हणून चार लक्ष रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. तात्काळ संजय गांधी निराधार योजनेत नाव नोंदविण्याचे आदेश तहसील प्रशासनास दिले.
या वेळी अमडापूर येथील मंडळ अधिकारी फटाले कर्तव्यदक्ष तलाठी राहुल भोजने ग्रामपंचायत टाकळी चे सचिव विनोद कृषी सहाय्यक जे.कदम
टाकळी (ई) गावच्या सरपंच सौ. उज्वला प्रभाकर हाके, इसापूर येथील पोलीस पाटील सौ संध्याताई मारकवार उपसरपंच दिलीप जाधव ग्रामपंचायत सदस्य, संदेश मोरे, बाळू चव्हान, प्रमोद जाधव, विठ्ठल गवाळे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र पांडे, नरेंद्र शिंदे, अमर दळवे, योगेश बाजपेयी, गजानन प्रतापवार, व गावातील मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.