टॉप बातम्या

वृद्धावर लाकडी उभारीने वार करणाऱ्यावर गुन्हा दाखल

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (८ ऑक्टो.) : मद्य सेवन केलेल्या व्यक्तीला घरी सोडणाऱ्या युवकाच्या आजोबालाच मद्यपी व्यक्तीने बैल बंडीची लाकडी उभारी मारून जखमी केल्याची घटना ७ ऑक्टोबरला सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास भालर येथे घडली. याबाबत नातवाने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

तालुक्यातील भालर गावात राहणारा आशिष मधुकर वरारकर (३५) हा अती मद्य प्रश्न करून असल्याने त्याला प्रतिक केशव गौरकार (२५) या युवकाने आपल्या मित्राच्या मदतीने घरी सोडून दिले. परंतु काही वेळानंतर आशिष वरारकर हा प्रतीक याचे आजोबा नामदेव घुलाराम गौरकार यांच्या घराजवळ आला. नामदेव गौरकार यांनी आशिष वरेरकर याला तू येथे कशासाठी आला, असा प्रश्न विचारताच त्याने हातातील बैल बंडीच्या लाकडी उभारीने नामदेव गौरकार यांच्यावर हल्ला चढविला. यात नामदेव गौरकार जखमी झाले. आजोबाला मद्यपी आशिष वरारकर याने लाकडी उभारी मारल्याचे कळताच नातू प्रतिक गौरकार याने वणी पोलिस स्टेशनला येऊन मारहाणीची तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपी आशिष मधुकर वरारकर याच्या विरुद्ध भादंवि च्या कलम ३२४, ५०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. मद्यपीला घरापर्यंत सोडणाऱ्या मदतगाराच्याच आजोबावर मद्यपीने हल्ला चढविला. लाकडी उभारीने वृद्ध आजोबावर वार केला. आजोबा थोडक्यात बचावले. दारूच्या नशेत हे दारुडे कधी कोणाच्या जीवावर उठतील याचा नेमच राहिलेला नाही. 

पुढील तपास ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात पोलिस करित आहे.
Previous Post Next Post