चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेक समस्या


सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (८ ऑक्टो.) : जिल्ह्यातील शासकीय सामान्य रुग्णालयात अनेक समस्या असुन रुग्णांना विनाकारण त्रास करावा लागताे. रुग्णालयात तपासणी साठी गेलेल्या रुग्णांना बाहेरील मेडिकल स्टोर्स मधील औषधी लिहुन दिल्या जाते ही वस्तुस्थिती आहे.  

गुरुवार दि.७ ऑक्टाेबरला बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने अधिष्ठाता जिल्हा सामान्य रुग्णालय तथा मेडिकल कॉलेज चंद्रपूर यांना मागण्यांचे एक लेखी निवेदन देण्यात आले .चंद्रपूर जिल्ह्यात अंदाजे पंधरा ते सोळा तालुके असून येथील लोकसंख्या 224307 घरात आहे. या रुग्णालयात रुग्णांना साेयी व सवलती बरोबर मिळत नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये दिवसेंदिवस असंतोषाचे वातावरण निर्माण होत आहे. आपत्कालीन रुग्ण ज्या वेळेस रुग्णालया मध्ये येतात त्या रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेर औषधी आणायला सांगितले जाते. ही बाब निश्चिंतच बराेबर नाही. सामान्य  रुग्णालयातील या कारभारामुळे गरीब जनता फार त्रस्त झाली आहे. हा प्रकार त्वरीत थांबावा या शिवाय नातेवाईकांना बाहेरून सी.टी. स्कॅन,  सोनोग्राफी, X-रे, व विविध प्रकारच्या औषधी लिहुन देणे हे (बाहेरील) काम त्वरीत बंद करावे.    सामान्य रुग्णालयात जे वैद्यकीय अधिकारी नेमलेले आहेत ते डॉक्टर सामान्य रुग्णालयाकडे लक्ष न देता ते स्वत:चा क्लिनिक सुरु करुन बसले आहे. अशा वैद्यकीय अधिकाऱ्याला किंवा डॉक्टरला ज्यांचे स्वत:चे रुग्णालय असून ते सामान्य रुग्णालयात काम करतात अशा डॉक्टरांना कामावरून वगळावे. अश्या विविध मागण्यांचा निपटारा येत्या १५ दिवसांत झाला नाही तर, तीव्र आंदोलन करण्यांचा इशारा बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे.

निवेदन सादर करताना BRSP जिल्हा महासचिव सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव,  मोंटो मानकर, गिरीश भोंडे, योगेश नगराळे, रमाबाई सातारडे, मायाताई सांड्रावार, अशोक आसमपल्लिवार, जगदीश मारबते, एकनाथ जिगरवार, तुषार क्षीरसागर, विभाताई सोनटक्के, जोशनाताई डांगे, ईश्वर बेले, दीपक दीप, रोशन नळे, फारूक शेख, नितीन कनाके, शिवदास सदाफडे, इरफान पठाण, करण कांळबांधे, राकेश पारशिवे, सदानंद डोरके, अशोक भगत, सचिन माहूरे, दत्ता वाघमारे भाग्यश्री भगत, मिनाताई गुडदे, आदित्य सिंग, हरीदास मोहजे, दिलीप बंडलवार ,विठ्ठल रासपलल्ले आदीं उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेक समस्या चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेक समस्या Reviewed by सह्याद्री चौफेर on October 08, 2021 Rating: 5
Powered by Blogger.