(संग्रहीत फोटो)
सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (८ ऑक्टो.) : चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुका अंतर्गत येत असलेल्या शंकरपुर येथील प्रभाग क्रमांक तीनच्या मुळ रहिवाशी जानू बादल मंडल या अवघ्या २२ वर्षीय विवाहित युवतीने आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना काल गुरुवारी दुपारी उघडकिस आली. परंतु जानु ने आत्महत्या का केली या मागचे नेमके कारण हे वृत्त लिहिपर्यंत कळु शकले नव्हते. दरम्यान, उपरोक्त बाब ही परिवाराच्या लक्षात येताच त्यांनी तिला प्राथमिक आराेग्य केंद्रात हलविले हाेते. तपासणी अंती तेथील डॉक्टरांनी जानूला मृत घाेषित केले.