टॉप बातम्या

कोंबडी चोरीच्या चर्चेवरून झाला वाद, युवकावर बंडीच्या उभारीने चढविला हल्ला

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (७ ऑक्टो.) : कोंबड्या चोरीला जात असल्याची चर्चा करणाऱ्या इसमावर चार जणांनी शस्त्रानिशी हल्ला चढविल्याची घटना काल ६ ऑक्टोबरला रात्री ९ वाजताच्या सुमारास शेलू (खुर्द) येथे घडली. सदर इसमाच्या घरच्या कोंबड्या चोरीला जात होत्या. तो रात्रीला जेवण करून आल्यानंतर पान ठेल्यावर घरच्या कोंड्या चोरीला जात असल्याची चर्चा करित होता. यावरून त्याठिकाणी उपस्थित असलेल्या व्यक्तीने त्याच्याशी वाद घालायला सुरवात केली. तुझ्या घरच्या कोंबड्या मीच चोरल्या व तुझ्याच विरोधात तक्रार देणार असल्याचे त्या व्यक्तीने सदर इसमाला म्हटले. एवढेच नाही तर त्या व्यक्तीने कुटुंबातील अन्य सदस्यांना बोलावून त्या इसमावर बैल बंडीच्या उभारीने हल्ला चढविला. उभारीचे वार त्या इसमाच्या डोक्यावर व हातावर लागल्याने तो गंभीर जखमी झाला. याबाबत पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

तालुक्यातील शेलू (खु.) या गावात रहात असलेल्या नरेंद्र थेरे (३०) याच्या कोंबड्या चोरीला जात होत्या. तो रात्री जेवण केल्यानंतर गावातील पाण ठेल्यावर खर्रा खाण्यासाठी आला असता त्याने कोंबड्या चोरीला जात असल्याचा विषय काढला. यावरून त्याठिकाणी उपस्थित असलेला उमेश वालकोंडावार हा चिडला. त्याने नरेंद्र थेरे याच्याशी वाद घालत तुझ्या कोंबड्या मीच चोरल्या व तुझ्याच विरोधात तक्रार देणार असल्याची दमदाटी केली. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने वडील दिलीप वालकोंडावार, भाऊ निलेश वालकोंडावार व अन्य एका व्यक्तीला बोलावून नरेंद्र थेरे याच्यावर बैल बंडीच्या उभारीने हल्ला चढविला. त्यात नरेंद्र थेरे याच्या डोक्याला व पायाला मार लागल्याने तो गंभीर जख्मी झाला. त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. चार जणांनी मिळून पतीवर शस्त्राने वार केल्याची तक्रार पत्नी साधना नरेंद्र थेरे (३०) यांनी पोलिस स्टेशनला नोंदविली. पोलिसांनी आरोपी दिलीप वालकोंडावार, उमेश वालकोंडावार, निलेश वालकोंडावार व प्रकाश पूर्ण नाव माहिती नाही यांच्या विरुद्ध भादंवि च्या कलम ३२६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

पुढील तपास ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात पोलिस करित आहे.
Previous Post Next Post