सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (७ ऑक्टो.) : सिलेंडरचा स्फाेट झाल्याने आग लागलेल्या चंद्रपूरातील निर्माणाधीन नविन मेडीकल काॅलेजची आज गुरुवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी केली असून अग्नी कांडात कामगारांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई संबधीत कंत्राटदाराने तात्काळ द्यावी अश्या सुचना त्यांनी केल्या आहे. संबधीत कंत्राटदारानेही सदरहु कामगारांना साधन - सामृग्री १२ तासात देण्याचे मान्य केले आहे.
यावेळी मेडीकल काॅलजचे व्यवस्थापक अमाशीद खोत, बिनोद कुमार, अशोक गुप्ता यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक पंकज गुप्ता, कलाकार मल्लारप, अमोल शेंडे, प्रा. श्याम हेडाऊ, सलीम शेख, राशिद हुसेन, विलास वनकर, विलास सोमलवार, विनोद अनंतवार, अॅड. परमहंस यादव, नितीन शाहा, गौरव जोरगेवार, बबलू मेश्राम, तिरुपती कलगुरुवार, सुरेंद्र अंचल आदींची उपस्थिती होती.
मंगळवारच्या रात्री निर्माणकार्य सुरु असलेल्या नवीन मेडीकल काॅलेजच्या परिसरात असलेल्या कामगारांच्या वसाहतीला अचानक आग लागली. यावेळी येथे असलेल्या आठ सिलेंडरचा स्फाेट झाल्याने आग आणखी भडकली. या आगीत येथील कामगारांचे जिवनावश्यक सर्व सामान जळून खाक झाले. त्यानंतर या कामागारांना शक्य ती मदत करण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना केल्या होत्या. तेव्हा पासून यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने येथे मदतकार्य सुरु होते. आज गुरुवार दि.७ ऑक्टाेबरला आमदार जोरगेवार यांनी सदरहु ठिकाणी भेट देत पाहणी केली. तसेच यंग चांदा ब्रिगेडच्या मदतकार्याचा आढावा घेत त्यांच्या कामाचे कौतूक केले.
कंत्राटदारानेही या आगीत नुकसान झालेल्या कामगारांना मदत करण्याच्या सुचना यावेळी आ. जोरगेवार यांनी केल्यात त्यानंतर सदर कामगारांना कपडे, भोजन सामृग्री, व जिवनावश्यक वस्तु १२ तासाच्या आत देण्याचे संबधीत कंत्राटदाराने मान्य केले आहे. यापूढे अशी कोणतीही घटना घडू नये या करिता फायर, संबधीत उपकरणे व इतर साेयी- सुविधा उपलब्ध करण्याच्या सुचना ही यावेळी आमदार जोरगेवार यांनी केल्या आहे. येथील कामगारांना सुरक्षा साधन देण्यात यावे, त्यांच्या सुरक्षे संबधी उपाय योजना करण्यांत याव्यात या ही सूचना यावेळी केल्या असून येथील उपाय योजनांवर लक्ष ठेवण्यासाठी एक कमेटी तयार करणार असल्याचेही यावेळी आ.जाेरगेवार यांनी स्पष्ट केले आहे.