मा. प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलीसांनी दिलेल्या असभ्य वागणुकीबाबत तसेच त्यांना करण्यात आलेल्या अटकेच्या व लखिमपुर खेरी येथे शेतकऱ्यांसोबत झालेल्या घटनेचा निषेध
सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागांव, (७ ऑक्टो.) : उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव मा. प्रियंकाजी गांधी या लखिमपुर खेरीला अत्यंत दुःख कार दुर्घटनेत मृत पावलेल्या शेतक-यांच्या परिजनांना भेटायला जात असतांना उत्तर प्रदेश येथील पोलीसांनी त्यांना अडवून त्यांच्याशी जो दुर्वव्यवहार केला, तो कदापी योग्य व न्यायसंगत नाही. तसेच त्यांना अटक अत्यंत अस्वच्छ असलेल्या रूममध्ये ठेवण्यात आले. या दोन्ही घटना अत्यंत लच्छिनास्पद असुन भारतीय न्याय व्यवस्थेला अनुरूप अशा नाही. यातुन उत्तर प्रदेश सरकारचा एक अत्यंत अमानवीय चेहरा जनतेसमोर आला. तसेच उत्तर प्रदेशातील सरकार विरोधी पक्षातील लोकांना दडपशाहीने बळाचा वापर करून त्यांना अन्यायाविरोधात बोलू देत नाही यावरून स्पष्ट होते. करिता काँग्रेस कमीटी महागाव तर्फे उपरोक्त दोन्ही घटनांचा व लखिमपुर खेरी येथे शेतकऱ्यांसोबत पडलेल्या दुदैवी घटनेचा या निवेदनाद्वारे निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी आरिया सुरैया, शैलेश कोपरकर, अंकुश कावळे, मालाताई देशमुख, दलीतानंद खडसे, महेबुब खाँ पठाण, मनोज केदार,
छायाताई गजानन वाघमारे, आशाताई सुनिल भरवाडे, संतोष गंधारे, मंदा महाजन, जयश्री अशोकराव इंगोले, गजानन सोपान साबळे, परवेज शफी सुरैया, विनोद पावडे, सुभाष देवराव नरवाडे, गजानन बळीराम कोल्हेकर, शेख जब्बार इसुफ, शे. बाबु शे. हासन, सुनिल माधवराव भरवाडे, श्रीकांत लिगदे, जयश्री संजय नरवाडे, विनोद उत्तमराव कोपरकर, किशोर जाधव, विष्णु बबनराव गांवडे, सविता संजय मानतुटे, राजेश रमेश आगासे, शेख सदाम शेख तयुब, प्रियंका अभिजित कावळे, संभाजी जाधव, विजय देवराव भरवाडे, नाना पाटे, सप्तार शे. रोशन, ई. सत्तार शे. जमाल यासह अनेक काँग्रेस चे पदाधिकारी उपस्थित होते .
मा. प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलीसांनी दिलेल्या असभ्य वागणुकीबाबत तसेच त्यांना करण्यात आलेल्या अटकेच्या व लखिमपुर खेरी येथे शेतकऱ्यांसोबत झालेल्या घटनेचा निषेध
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 07, 2021
Rating:
