सह्याद्री न्यूज | रवि वल्लमावर
केळापूर, (७ ऑक्टो.) : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, पांढरकवडा च्या मुख्यबाजार आवारात आज दिनांक ०७/१०/२०२१ रोज गुरूवार ला मा. सभापती गजानन बेजंकीवार यांच्या हस्ते सोयाबिन खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. प्रथम येणारे शेतकरी हनमंतु आशन्ना बोमकंटीवार ग. पांढरकवडा यांचा समितीच्या वतीने शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. आज शुभारंभाच्या पहील्याच दिवशी २०० क्विंटल सोयाबिन शेतकऱ्यांनी विक्री करीता आणली असता शुभारंभाला जास्तीत जास्त प्रति क्विंटलरू ५३५५/- या भावात खरेदी करण्यात आली.
या शुभारंभा प्रसंगी मा. उपसभापती प्रेमदास राठोड तसेच सर्व संचालक निमिष मानकर, बिसनसिंग शिंदो, विरेंद्र तोडकरी, जानमहमंद जिवाणी, गंगारेडडी क्यातमवार, राकेश नेमनवार, सतोष बोरेले, विशेष कुळसंगे, इलीयास सिध्दीकी, सुहास कापर्तीवार, विलास भोयर, दौलत आडे, निलेश मंचलवार, अनिल अंगलवार, सौ कविता तालकोकुलवार, इंदिराताई मिलमिले तसेच अमर पाटील तसेच खरेदीदार व अडते, गजानन कापर्तीवार, रंजनीकांत बोरेले, पंकज सिंघानिया, अब्दुल हमीद शेख, बाबाराव धादोड, सुरेश झोटींग, गुणवंत केळापुरे शंकर अकेवार, हटकर, विवेक शानमवार, सतिष कैटीकवार तसेच समितीचे कर्मचारी आणि परीसरातील शेतकरी उपस्थित होते . शेतकऱ्यांनी आपला शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समिती , पांढरकवडा येथे विक्रीस आणावा तसेच कोवीड -१९ च्या नियमाचे पालन करण्यात यावे तसेच यार्ड मध्ये मास्क लावणे तसेच सोशल डिस्टन्सींग चे पालन करावे. असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन बेजंकीवार यांनी केले.
पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सोयाबिन खरेदीचा शुभारंभ
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 07, 2021
Rating:
