सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागांव, (७ ऑक्टो.) : अपंगाच्या कल्याणाकरीता शासनाच्या विविध योजना असून त्यांचे जिवनमान उंचावण्याकरीता आपल्या कार्यालयाकडे ५ टक्के निधी उपलब्ध असतानाही तो खर्च केलेला नाही. महागांव शहरातील अपंग व्यक्ती लामापासून वंचित राहीले आहेत त्यामुळे अत्यंत गरजु अपंग लाभार्थ्यांना प्राधान्य देवून त्वरीत निधी वाटप करण्यात यावा.
रमाई घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत लामाश्यांना उर्वरीत हप्ते न मिळाल्यामुळे लाभाथ्यांचे डोक्यावर कर्जाचा डोगर निर्माण झाला आहे. त्यांनी बांधकामाकरीता हातउसण घेतलेले पैसे परत करण्यास अडचण निर्माण होत आहे. आपल्या कार्यालयामध्ये वारंवार चकरा मारुन सुध्दा घरकुलाचे हप्ते देण्यास टाळाटाळ होत आहे. त्यामुळे सदर घरकुल योजनेचे उर्वरीत हप्ते त्वरीत देण्यात यावे .
अनु. जाती जमाती मुलीची निवासी शाळेच्या शेजारील घनकचरा आपले कार्यालयामार्फत टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे शाळेजवळ घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. परिणामी शाळकरी मुलीचे आरोग्य धोक्यात येवून साधीचे रोग परसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सदर घनकचना त्वरीत उचलून त्याची विल्हेवाट लावण्यात यावी अन्यथा यामध्ये काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास नगरपंचायत जबाबदार राहील असे निवेदनातुन प्रशासनाला इशारा वंचित चा कार्येकर्ते दिला आहे.
महागांव शहरात सततच्या होणाऱ्या अतिवृष्टीमुळे डासांचे प्रमाण अतिषय वाढले असून डेंगू, मलेरीया, साथीचे रोग पसरु नये म्हणून डास प्रतिबंधात्मक उपाययोजना त्वरीत करण्यात याव्यात अन्यथा सदर आजारामुळे जिवित हाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही .
शहरातील मोकाट जनावरे यांचेमुळे नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच मुख्य रस्त्यावर या मोकाट जनावरांमुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. यापुर्वी सुध्दा मोकाट जनावरे यांचेमुळे काही किरकोळ अपघात झाले आहेत परंतु जिवीत हाणी झाली नाही. यापुढे जिवीत होणी होऊ नये म्हणून शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा.
अन्यथा वंचित बहुजन आघाडी महागांव तालुका तर्फे तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा, इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी विजय लहाने, विजयकुमार कांबळे, शेख अशपाक शे. आगा, पप्पुभाऊ कावळे, रामराव कांबळे, प्रशांत देशमुख, गौतम पडघणे, प्रमोद कोकरे इ. वंचितचे पदाधिकारी उपस्थित होते.