टॉप बातम्या

चंद्रपूरात कामगारांचे अन्नत्याग आंदोलन- आजचा तिसरा दिवस


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (८ ऑक्टो.) : तब्बल ५०० कर्मचा-यांना गाेपानी व्यवस्थापनाने कामावरुन कमी केल्यामुळे तेथील कामगार व त्यांचे कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. एव्हढेच नाही तर सदरहु व्यवस्थापन या बाबतीत कामगारांशी साधी चर्चाही करायला तयार नाही. या संदर्भात काँग्रेसचे नेते दिनेश चाेखारे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचे या बाबत एका निवेदनातुन लक्षवेधले असल्याचे समजते.

चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालया समाेर गाेपानी विराेधात कामगार अन्नत्याग आंदाेलनास बसले असुन, आज या आंदाेलनाचा तिसरा दिवस असल्याचे कामगारांनी आमच्या प्रतिनिधीशी बाेलतांना सांगितले. दरम्यान शुक्रवार दि.८ ऑक्टाेंबरला नितिन खरतड, नरेन्द्र वाकडे, प्रशांत पिंपळे, विजय मासारकर,व श्याम सुंदर मेश्राम अन्नत्याग आंदाेलनास बसले हाेते.
Previous Post Next Post