कामगार नेते नरेशबाबू पुगलिया यांच्या पुढाकाराने अंबुजा सिमेंट येथील मृतकाच्या परिवाराला 23 लाखांची आर्थिक मदत व मुलाला नोैकरी
सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (८ ऑक्टो.) : काल ७ आक्टोंबरला अंबुजा सिमेंट (उपरवाही) येथे मे. विजया ॲन्ड कंपनी मध्ये काम करित असलेले कंत्राटी कामगार गणेश भिमराव कोडापे हे कंपनीमध्ये कामावर असतांना त्यांचा आकस्मित मृत्यू झाला. या घटनेची माहिती मराठा सिमेंट कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कामगार नेते नरेशबाबू पुगलिया यांना दिली. या प्रकरणात बाबूजी व अंबुजा सिमेंट युनिट हेड यांच्यात बरीच चर्चा झाली. त्यानुसार कामगार नेते नरेशबाबू पुगलिया यांच्या नेतृत्वात असलेल्या मराठा सिमेंट कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्वरीत व्यवस्थापनासोबत चर्चा करून मृत कामगाराच्या नातेवाईकाला १५ लाख व कामगार नियमानुसार मिळणारे ८ लाख असे एकुन २३ लाख रूपये तसेच त्या कामगाराच्या मुलाला नौकरी, मृत कामगांराच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च व्यवस्थापनाने उचलावा ही मागणी रेटून धरली. अखेर व्यवस्थापनाने नरेशबाबू पुगलिया यांच्या कणखर भुमिकेमुळे मृत कामगारांच्या पत्नीला आर्थिक मोबदला म्हणून १५ लाख व मुलाला नौकरी देण्यासाठी तयार झाले व शेवटी रात्री १ वाजता कामगार संघटनेचे जनरल सेकटरी अजय मानवटकर जॉइंट सेक्रेटरी सागर बलकी, सदस्य इकबाल शेख आणि ६ मैन कमिटी व अंबुजा सिमेंटचे युनिट हेड अश्विन रायकुंडलिया, मैनेजर एच. आर. नरेंद्र जानवे यांच्यात करार झाला व करारानुसार वरील सर्व मागण्या अंबुजा सिमेंट व्यवस्थापनाने मान्य करून स्वाक्षरी चे पत्र देण्यात आले. त्यानंतर मृत कामगाराची प्रेत त्यांच्या गावी (विरूर) येथे रात्री २ वाजता अम्बुलन्सने पाठविण्यात आले.
कामगार नेते नरेशबाबू पुगलिया यांच्या पुढाकाराने अंबुजा सिमेंट येथील मृतकाच्या परिवाराला 23 लाखांची आर्थिक मदत व मुलाला नोैकरी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 08, 2021
Rating:
