चंद्रपूरात हिरव्या भाज्यांचे भाव गगनाला भिडले

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (९ ऑक्टो.) : चंद्रपूरात गेल्या तीन महिण्यांपुर्वि हिरव्या भाज्यांचे भाव सर्वांना परवडेल असेच हाेते. परंतु गेल्या दीड दाेन महिण्यांपासून भाव चांगलेच वाढले असुन, हिरव्या भाज्यांचे भाव ऐकुन सर्व सामान्य जनतेच्या ताेंडचे पाणी पळाले आहे. वांगे जे ठाेक बाजारात पंधरा ते विस रुपये प्रति किलाे मिळत हाेते. ते आज साठ रुपये प्रति किलाेच्या घरात पाेहचले आहे. चवळी भाजी प्रति ७० ते ८० रुपये किलाे प्रमाणे बाजारात विकल्या जात आहे. दरम्यान वाल शेंगा, चवळी शेंगा, मेथी भाजी, पालक, चवळी भाजी यांचे भाव चांगलेच भडकले आहे.

एरव्ही २० रुपये प्रति किलाे विकल्या जाणां-या आलूचे भाव प्रति किलाे मागे १० रुपयांनी वाढले असल्याचे गाेल बाजारातील एका व्यापाऱ्याने सांगितले. काेंथीबिर,हिरवी मिरची, टमाटर यांचे भावात म्हणावी तशी वाढ झाल्याचे दिसून आले नाही. कांदे ४० रुपये प्रति किलाे विकल्या जात आहे तरं फूल काेबीचे भाव बरेच वाढले आहे. सध्या भाज्यांचे भाव भडकल्यामुळे गृहणींचे महिण्याचे बजेट पुर्णत: बिघडले आहे हे तितकेच खरे ! सध्या तरी हिरव्या भाज्यांचे भाव दिवाळी पर्यंत कमी हाेईल असे वाटत नाही.  
चंद्रपूरात हिरव्या भाज्यांचे भाव गगनाला भिडले चंद्रपूरात हिरव्या भाज्यांचे भाव गगनाला भिडले Reviewed by सह्याद्री चौफेर on October 09, 2021 Rating: 5
Powered by Blogger.