यंग चांदा ब्रिगेडच्या प्रयत्नाला यश - मनपा प्रशासनाने घेतली निवेदनाची दखल !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (२८ ऑक्टो.) : चंद्रपूर शहरातील इंदिरानगर हनुमान टेकडी येथे पायभूत सुविधांचा अभाव असून या सुविधा अभावी येथील नागरिकांना ब-याच अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या भागात तात्काळ पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात अश्या मागणीचे एक लेखी निवेदन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मनपा आयुक्त राजेश मोहिते यांना काल दि.२७ ऑक्टाेंबरला सादर करण्यात आलेे हाेते. दरम्यान, आज दि. २८ ऑक्टाेंबरला मनपाच्या काही अधिकारी व कर्मचा-यांनी प्रत्यक्ष इंदिरा नगर येथे भेट देवून खरी परिस्थिती जाणून घेतली. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे हे स्वता हजर हाेते. तर काल याच मागणीचे निवेदन देतांना संघटक आनंद इंगळे, राम जंगम, नरेश आत्राम, नरेश मुलकावार, शकील शेख, व बंडू पटले उपस्थित होते.
इंदिरानगर येथील हनुमान टेकडी परिसरात दाट लोकवस्ती आहे. मात्र येथे नाली रस्ता नसल्याने घरातून निघणारे सांडपाणी रस्त्यावर वाहते. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. या सर्व प्रकारामुळे तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून परिसरातील नागरिकांना डेंग्यू, ताप, हिवताप, डायरिया अशा रोगांची वांरवार लागण होत आहे.
त्यामूळे या भागाचा विकास करुन येथे पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यांची मागणी निवेदनातुन प्रामुख्यांने करण्यांत आली हाेती. येत्या आठ दिवसात येथील सर्व समस्या सुटाव्या अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी आपल्या बाेलण्यांतुन व्यक्त केली आहे.

यंग चांदा ब्रिगेडच्या प्रयत्नाला यश - मनपा प्रशासनाने घेतली निवेदनाची दखल ! यंग चांदा ब्रिगेडच्या प्रयत्नाला यश - मनपा प्रशासनाने घेतली निवेदनाची दखल ! Reviewed by सह्याद्री चौफेर on October 28, 2021 Rating: 5
Powered by Blogger.