मारेगाव: क्रांतीविर शामा दादा कोलाम संघटना कार्यकारण गठीत

सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (२८ ऑक्टो.) : येथील आज क्रांतीवीर शामादादा कोलाम संघटना गठीत करण्यात आली.  नव्यानेच नियुक्ती झालेल्या कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांचे समाज बांधवांनी एकमताने सहमती दर्शवून स्वागत केले. यावेळी तालुकाध्यक्ष पदी प्रशांत टेकाम, तालुका उपाध्यक्ष दादाराव आत्राम, तालुका सचिव पोतु आत्राम, कोषाध्यक्ष राजू टेकाम, कोषाउपाध्यक्ष दादाराव ढोबरे, सहसचिव रवींद्र आत्राम, वेगाव सर्कल विभाग तुकाराम आस्वले, सुदर्शन टेकाम, रामपाल रामपुरे, हरिभाऊ रामपुरे यांचीही यावेळी नविन कार्यकारीणी मध्ये निवड करण्यात आली आहे.
आयोजित करण्यात आलेल्या नवीन क्रांतीवीर शामा दादा कोलाम संघटनेच्या नवनियुक्त कार्यकर्ते, कार्यकारणी, कार्यकर्ते समाजबांधव निश्चितच दिलासा देणारी ठरेल असे उपस्थितांच्या वतीने सांगण्यात येत आहे. सामाजिक बांधिलकीची व आदिम कोलाम समाजातील अन्याय अत्याचार, शोषणाचा पर्दाफाश करण्याचे ताकद निश्चितच कोलाम समाजातील लोकांना आहे. या अगोदर सुध्दा आदिवासी चळवळीत सामाजिक आंदोलनात कोलाम अग्रभागी होताच व आहे. सामाजिक जागृती चा प्रमाण बराच आहे पण, एवढ्या वरच आपल्याला समाधान मानता येणार नाही. त्या दृष्टीने मारेगाव तालुक्यातील कोलाम समाज बांधवांनी एकजुट होवून संघटीतपणा दाखवावा लागेल. 
जंगल,जल वनजमीनीचे महसूल गावे पिण्याच्या शुद्ध पाणी, शिक्षण आरोग्य, रोजगार, रस्ते, विकासासाठी अनेक समस्यांना घेऊन वेळ आली तर रस्त्यावर उतरून संघर्ष व आंदोलन सुद्धा करावा लागेल. वरील सहजासहजी प्रस्थापित यंत्रणाकडून होईलच असेही म्हणतात येणार नाही.
मारेगाव: क्रांतीविर शामा दादा कोलाम संघटना कार्यकारण गठीत मारेगाव: क्रांतीविर शामा दादा कोलाम संघटना कार्यकारण गठीत Reviewed by सह्याद्री चौफेर on October 28, 2021 Rating: 5
Powered by Blogger.