टॉप बातम्या

मारेगाव: वेगाव येथील महिलेचा सर्पदंशाने मृत्यू


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (२९ ऑक्टो.) : मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील महिलेला सर्पदंश झाल्याने तिचा मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज गुरुवारला सायंकाळी ६ च्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेने वेगाव सह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 
    
जिजा पुरोषात्तम माथनकर (५८) असे सर्पदंश झालेल्या महिलेचे नाव आहे. सध्या कापूस वेचणीचा हंगाम असल्याने कापूस घेऊन महिला गोठ्याकडे आली. बैलांची व्यवस्था करीत असतांना गोठ्यातच जिजा ला सर्पदंश झाला. तातडीने तिला मारेगाव ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();