• रासेयो व राष्ट्रीय छात्र सेना आणि नगरपरिषद वणी प्रशासनाचा संयुक्त उपक्रम
सह्याद्री न्यूज | शंकर घुगरे
वणी, (२९ ऑक्टो.) : स्थानिक वणी दिनांक 22/10/2021 पासुन राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना व वनी नगर परिषद प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन कवच-कुंडल अभियाना अंतर्गत महाविद्यालयात कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे.
या लसीकरण शिबिराला महाविद्यालयालतील प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे , राष्ट्रीय छात्र सेना चे ANO प्रा.डॉ. रवींद्र मत्ते रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ नीलिमा दवणे आणि प्रा. किशन घोगरे यांनी उपस्तीत राहून लस घेण्यासाठी प्रोत्साहित केले. व शुभेच्छा देत महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले.
या लसीकरण मोहिमेला राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व राष्ट्रीय छात्र सेना स्वयंसेवक हे शिबिराच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेत आहेत.
लोकमान्य टिळक महाविद्यालयातील लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 29, 2021
Rating:
