सह्याद्री न्यूज | योगेश मडावी
झरी, (२८ ऑक्टो.) : केळापूर तालुक्यातील शेवटच्या टोकावरील अर्ली पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपळशेंडा या गावातील शेतकरी भीमराव पोतू टेकाम (६५) हा नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेला असता, शेजारील नाल्यांमध्ये शौचास बसल्या ठिकाणी अचानक गायब झाल्याने एकच खळबळ उडाली.
भिमराव वर वाघाने हल्ला तर केला नसेल ना! असा संशय व्यक्त केला जात असून, पांढरकवडा पोलीस स्टेशन ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कोळी साहेब, वनविभाग, अभयारण्य विभागाची टीम तसेच शेकडो गावकऱ्यासह शोध मोहीम राबवली असून, गेल्या आठ दहा तासापासून सात ते आठ किलोमीटरचे अंतर शोधले, परंतु भिमराव चा कुठेच शोध न लागल्याने आज रेस्क्यू टीम कडून शोध घेण्यात येणार असल्याचे समजते.
या शोध भूमीमध्ये पोलीस विभाग, वनविभाग व गावकरी यांच्या माध्यमातून शोधाशोध केली असता, भिमराव न सापडल्याने वाघाने हल्ला केला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
"गावकऱ्यांनी दिलेल्या माहितनुसार भिमराव टेकाम हा ईसम २७ ऑक्टाेंबर पासून बेपत्ता असल्याचे कळले त्या अनुषगाने जंगल व परिसरात शोध घेण्यात येत आहे. परंतु अजून पर्यंत भिमराव चा शोध लागलेला नाही."
~ महेश बाळापूरे
वनपरिक्षेत्र अधिकारी टीपेश्वर अभयारण्य
लापता भिमराव पोतु टेकामचा "रेस्क्यू टीम" घेणार शोध
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 29, 2021
Rating:
