माजी शिवसेना तालुका प्रमुख सुरेश नेहारे काळाच्या पडद्याआड

सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (२९ ऑक्टो.) : सुरेश किसनाजी नेहारे  (६०) रा. मारेगाव यांचे अल्पशा आजाराने आज  १२.२० वाजताचे दरम्यान, निधन झाले. मारेगाव येथील सिंहझेप तथा मारेगाव वार्ता (पोर्टल) मराठी दैनिकाचे प्रतिनिधी पंकज नेहारे यांचे ते वडील होते.

श्री.सुरेश नेहारे हे मागील चार दिवसापूर्वी स्वगृही प्रसाधन गृहात पडले होते. त्यांना लगेच चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून व्हेंटिलेटर वर असतांना त्यांची प्राणज्योत मालविली.
सन १९८०-९० च्या दशकात त्यांनी राजकारणात उडी घेत शिवसेनेत प्रवेश केला होता. लगेच जिल्हा पक्ष प्रमुखांनी उभरता शिवसैनिक म्हणून सुरेश नेहारे यांच्यावर 'तालुका शिवसेना प्रमुख' म्हणून जबाबदारी सोपविली होती. तालुका शिवसेना प्रमुख म्हणून ते शिवसेनेचे मारेगाव तालुक्यातील प्रथम शिवसेनाप्रमुख होते. तालुक्यात शिवसेनेचा जन्म होताच सुरुवातीलाच तालुका प्रमुख होत त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. कालांतराने पक्षातील वैयक्तिक मतभेद व गटातटाने नेहारे यांनी माघार घेत राजकारणाला पूर्ण विराम दिला होता.

परिणामी आज अल्पशा आजाराने त्यांच्या निधनाची बातमी कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे. सुरेश नेहारे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंड असा आप्तपरिवार आहे. 
माजी शिवसेना तालुका प्रमुख सुरेश नेहारे काळाच्या पडद्याआड माजी शिवसेना तालुका प्रमुख सुरेश नेहारे काळाच्या पडद्याआड Reviewed by सह्याद्री चौफेर on October 29, 2021 Rating: 5
Powered by Blogger.