राज्य कर्मचारी वर्गांचे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर ठिय्या आंदोलन

सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२९ : ऑक्टो.) : प्रलंबित मागण्या व NPS योजना रद्द करुन जुनी परीभाषित पेन्शन योजना शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करण्याकरीता आज शुक्रवार दिनांक 29 ऑक्टोंबर 2021 ला दुपारी 2.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
             
यासाठी सांप्रत महाविकास आघाडी सरकारने
1) NPS योजना रद्द करुन जुनी परीभाषित पेन्शन योजना सर्वांना लागू करावी.
2)देशातील अनेक राज्यांनी जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करण्याची शिफारस विधीमंडळाच्या ठरावाव्दारे केंद्र शासनाला केली आहे. महाराष्ट्र शासनाने सुध्दा अशी शिफारस तात्काळ करावी.
3) NPS धारक कर्मचाऱ्यांना सद्यस्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे कुटुंब निवृत्तीवेतन आणि उपदान अनुज्ञेय करावे.
4)राज्यातील NPS धारक कर्मचाऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या 14 टक्के अंशदान रक्कमेची वजावट आयकरासाठी एकूण वार्षिक उत्पन्नातून अनुज्ञेय करावी आणि
5) ऑक्टोंबर 2005 पूर्वीच्या शासकीय सेवेचा राजीनामा देऊन नवीन सेवा स्विकारलेल्या तसेच नोव्हेंबर 2005 पूर्वी निवड होवून उशिरा नियुक्ती आदेश मिळालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी परीभाशित पेन्शन योजना लागू करावी. या प्रमुख मागण्या पूर्ण करण्याच्या उद्देषाने हे ठिय्या आंदोलन करण्यात आले.

उपराेक्त ठिय्या आंदोलनाला अध्यक्ष म्हणून दिपक जेऊरकर, प्रमुख अतिथी म्हणून अरुण तिखे, अविनाश सोमनाथे, शालीक माऊलीकर, सुचिता धांडे व बंडु मेश्राम आदी मान्यवरांची उपस्थिती होती. चंद्रकांत कोतपल्लीवार, अमोल आखाडे, सिमा पॉल, राजु धांडे, अरुण तिखे, शालीक माऊलीकर, सुचिता धांडे, सुनिल दुधे व दिपक जेऊरकर आदींनी मार्गदर्शन केले. सदरहु ठिय्या आंदोलनाचे सुत्रसंचालन संतोष अतकारे यांनी केले तर आभार प्रदर्शन अनंत गहुकर यांनी केले.
             
पार पडलेल्या या आंदोलनात महसुल विभाग, बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, कोषागार कार्यालय, वन विभाग, वस्तु व सेवा कर विभाग, भुमि अभिलेख विभाग, कृषी विभाग, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र कर्मचारी, अभियांत्रिकी महाविद्यालय, भुविज्ञान-खनिकर्म विभाग, आरोग्य विभाग, पोलीस अधिक्षक कार्यालय कर्मचारी आदी विभागाचे कर्मचारी तसेच दिपक जेऊरकर, राजु धांडे, संतोष अतकारे, राजेश लक्कावार, राजेश पिंपळकर, श्रीमती सिमा पॉल, चंद्रकांत कोतपल्लीवार, श्रीमती रजनी आनंदे, अजय चहारे, संदीप गणफाडे, प्रशांत कोशटवार, अविनाश बोरगमवार, राजेंद्र समर्थ, गणेश मानकर, अतुल भिसे, शैलेंद्र धात्रक, प्रविण अदेंकीवार, अतुल किनेकर, अमोल अवधाने, मंगेश कोडापे, रविंद्र आमवार, श्रीकांत येवले, अतुल साखरकर, नितीन पाटील, श्रीमती एस.आर. माणुसमारे, अनंत गहुकर, महेश पानसे त्याचबरोबर विविध कार्यालयीन संघटनांनी आपला सक्रिय सहभाग दर्शविला होता.
राज्य कर्मचारी वर्गांचे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर ठिय्या आंदोलन राज्य कर्मचारी वर्गांचे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर ठिय्या आंदोलन Reviewed by सह्याद्री चौफेर on October 29, 2021 Rating: 5
Powered by Blogger.