नियमाची पायमल्ली,पटवारी सदस्यांची दिशाभूल !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (२९ ऑक्टो.) : तलाठ्यांच्या आर्थिक व सेवा विषयक मागण्यांसाठी इमाने इकबारे लढणारे तथा सेवेत असतांना शासनाविरुध्द आवाज बुलंद करणारे विदर्भ पटवारी संघटनेचे झुंजार नेते संघर्षी स्व.वि.म. उजवणे यांनी पटवारी संघटनेची मुहुर्तमेढ राेवत त्या संघटनेच्या शाखा प्रत्येक जिल्हा व तालुका स्तरांवर सुरु केल्या हाेत्या.

विदर्भ पटवारी शाखेप्रमाणचे या देखील शाखांचे काम नियमानुसार व नियोजित वेळेनुसार व्हायला हवे. या भूमिकेशी ते नेहमीच कायम व प्रामाणिक राहिले हाेते. एव्हढेच नाही तर, विदर्भ पटवारी संघटनेच्या संपूर्ण ध्येय धाेरणानुसार आजपर्यंत चालणारी त्यांची कार्यप्रमाली सर्वांनी अनुभवली हाेती. परंतु अलिकडे त्यांनी संघटनेसाठी घालून दिलेल्या नियमांची अक्षरश: पायमल्ली करुन स्वमर्जीने निर्णय घेण्याची प्रथा सुरु झाली असुन, असाच एक प्रकार राजूरा उपविभाग पटवारी संघटनेकडुन राजूऱ्या नव्यानेच बांधलेल्या परस्पर गाळे विक्री प्रकरणात उघडकीस आला आहे. या बाबतीत राजेन्द्र पचारेसह अन्य सदस्यांनी विदर्भ पटवारी संघटनेचे केन्द्रीय अध्यक्ष नागपूर यांचेकडे लेखी तक्रार नाेंदविली आहे.
उपराेक्त संदर्भात हाती आलेल्या माहितीनुसार असे कळते की, राजूरा उपविभाग शाखेमधील सध्या कार्यरत असलेले अध्यक्ष, उपाध्यक्ष सचिव, या शिवाय जिल्हा अध्यक्ष जिल्हा सचिव व १३ सदस्य यांचे प्रमुख उपस्थितीत निव्वळ संदेशाच्या माध्यमांतुन दि.१९\१०\२०२१ ला तहसिल कार्यालय राजूरा येथील सभागृहात एक सभा पार पडली यात गाळे बाबत निर्णय हाेता. दरम्यान या पूर्वी दि.११\९\२०२१ राेजी पटवारी मागणी दिनामध्ये समाेरील गाळे किरायाने देण्याबाबत ठरले हाेते. ठरल्याप्रमाणे प्रथम दर्शनी दाेन गाळे अतिमहत्वाचे असुन ते रस्त्या लगतचे आहे. ते लिलावात देखील जाणारे हाेते. त्यासाठी निविदा काढायची असे सर्वानुमते ठरले हाेते. याच बांधकाम झालेल्या समाेरील गाळ्याची पगडी तीन लाख रुपये व मासिक किराया पाच हजार रुपये तर, मागील गाळ्याबाबत पगडी दाेन लाख व प्रतिमाह किराया तीन हजार रुपये ठरविण्यात आलेला हाेता. बांधकाम ठेकेदारास बांधकामाचे वाढीव रक्कम विस लाख रुपये देणे असल्यामुळे आठ लाख रुपये पगडी व उर्वरीत गाळे पुढील सभेत किरायाने देण्याचे ठरले हाेते. जमा सहा लाख पन्नास हजार रुपये त्यात आठ लाख रुपये अधिक जवळपास एकुण संघटनेकडे १५ लाख रुपये जमा हाेणार हाेते. एका सभेत काही जेष्ठ मंडळीनी निविदा सुचनेची जाहिरात देण्याबाबत (भाड्याने देण्याबाबत) सुचित केले हाेते त्यास सर्वांनी मान्य करत हाेकार देखील दिला. दि.१९\१०\२०२१ च्या सभेत चर्चा किंवा निर्णय हाेणार असे सर्व सदस्यांना वाटत हाेते. त्यामुळे गाळे किरायाने घेण्यांसाठी काही सभासद उपस्थित राहिले. परंतू १२३, १२४, १२५, व १२६ पैकी प्लाट क्रं.५५ क्षेत्र ३०० चाै.मी. वर नवीन बांधकाम निर्मिती करुन ग्राँऊंड लेवल वर तयार करण्यात आलेले १५ गाळ्यांपैकी समाेरचे दाेन गाळे उपविभाग शाखेचे सध्याचे कार्यरत असलेले अध्यक्ष व जिल्हा शाखेचे विद्यमान उपाध्यक्ष यांनी अन्य सभासदांची दिशाभूल व नियमांची पायमली करुन स्वता खरेदी करण्याबाबतचा परस्पर ठराव घेतला. तसेच या गाळ्या बाबतची बेसीक प्राईज ठरविण्यात आली नाही व त्याची प्रसिध्द सुध्दा देण्यात आली नाही. उपरोक्त सभेबाबत संघटनेच्या नियम २९ व ३० नुसार काेणतेही अनुपालन करण्यात आले नसुन स्वताच्या मर्जीतुन एक तर्फी निर्णय घेतला असा स्पष्ट आराेप राजेन्द्र पचारे यांनी आज बाेलतांना 
राजूरा मुक्कामी केला.

सदरहु बांधकामात गुंतविलेली रक्कम ही स्व.वि.म. उजवणे यांचे हयातीत विदर्भातील प्रत्येक जिल्ह्याच्या केन्द्रीय सभेत ठराव पारीत करुन संघटनेची राजूरा स्थित जुणी वास्तु नव लक्ष २५ हजार रुपयांत विक्री करुन ती रक्कम बंँकेत जमा करण्यांत आली हाेती. त्याच कालावधीत उजवणे हयातित असतांना केन्द्राध्यक्ष यांचे पुर्वसंमतीने १२३\१२४\१२५\१२६ पैकी प्लाट क्र.५५ क्षेत्र ३०० चाै.मी. खरेदी करण्यात आला. या मध्ये ख-या अर्थाने सेवानिवृत्त तलाठी, मंडळ अधिकारी सभासद, दिवंगत झालेले तलाठी बांधव व आज हयातीत असलेले पटवारी व मंडळ अधिकारी यांचा सिंहाचा व माेलाचा वाटा हाेता हे विसरता येण्या सारखे नाही. जमा झालेली गुंतवणूक रक्कम व त्याची जपणूक ठेवण्याचे काम त्यांनी आज पावेताे प्रामाणिकपणे केले. यांची कल्पना सर्वांनाच हाेती.
विद्यमान असलेले पदाधिकारी, अध्यक्ष जिल्हाध्यक्षांनी व इत्तरांनी आपल्या स्वार्थापाेटी उपरोक्त भूखंडाची विल्हेवाट लावण्यांचे षडयंत्र रचले. हा प्रकार एकंदरीत दिशाभूल करणारा असून भविष्यात संघटनेत दुफळी हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदरहु संघटना ही नाेंदणीकृत असून सभेचे सर्वांना नाेटीसा देणे हे अनिर्वाय हाेते परंतु उपरोक्त काही ठराविक पदाधिकारी व सदस्यांनी सर्वांना विश्वासात न घेता मालमत्तेची पुर्णता विल्हेवाट लावली आहे.

अशा या प्रकारामुळे काही जुन्या व नव्या सदस्यांत नाराजीचा सुर उमटला असून, उपरोक्त प्रकरणात याेग्य चाैकशी व्हावी अशी अपेक्षा राजेन्द्र पचारेंसह अन्य काही सदस्यांनी व्यक्त केली आहे.  
नियमाची पायमल्ली,पटवारी सदस्यांची दिशाभूल ! नियमाची पायमल्ली,पटवारी सदस्यांची दिशाभूल ! Reviewed by सह्याद्री चौफेर on October 29, 2021 Rating: 5
Powered by Blogger.