सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (१० ऑक्टो.) : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर यांच्या सृनुषा किरणताई देरकर यांनी आपला वाढ दिवस धुमधडाक्यात साजरा न करता गरीब महिलेच्या उपजीविकेचा प्रश्न सोडविला. हालाकीची परिस्थिती असलेल्या महिलेला मदतीचा हात दिला. शिवणकाम येत असतांना शिलाई मशीन घेण्याची ऐपत नसलेल्या गरीब महिलेला त्यांनी शिलाई मशीन भेट देऊन तिच्या उपजीविकेचा मार्ग सुकर केला. मोलकरीण म्हणून काम करणारी लालगुडा येथील प्रतिभा नागराळे ही महिला शिवणकला अवगत असूनही आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शिलाई मशीन खरेदी करू शकत नव्हती. या हूरहुन्नरी महिलेच्या मदतीला किरणताई धावल्या, व तिला संसाराचा गाढा चालविण्यास हातभार लागावा म्हणून शिलाई मशीन भेट म्हणून दिली. समाजकार्यात नेहमी अग्रेसर राहणाऱ्या एकविरा महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा किरणताई देरकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. सामाजिक क्षेत्रात संजय देरकर यांचीही भरीव कामगिरी राहिली आहे. त्यांनीही गोरगरिबांना मदत करण्यापासून तर गरिब युवकांना रोजगार मिळवून देण्यापर्यंत स्वतःला सामाजिक कार्यात वाहून घेतलं आहे. सर्वसामान्यांचे पाठीराखे म्हणून ते नेहमी जनतेच्या पाठीशी उभे राहिले. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन किरणताई देखील गोरगरिबांना आधार देऊ लागल्या आहेत. उम्मेदीने जगण्याकरिता मदतीचा हात देऊ लागल्या आहेत. वाढ दिवसावर पैशाची उधळण न करता आर्थिक दुर्बल महिलांना सक्षम करू लागल्या आहेत. त्यांच्या दातृत्व भावनेचं सर्वच स्तरातून कौतुक केल्या जात आहे. त्यांच्या वाढ दिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव तर झालाच पण त्या राबवित असलेल्या सामाजिक उपक्रमांचीही चांगलीच प्रशंसा झाली. त्यांच्या आर्थिक सहकार्याच्या प्रेरणेतून महिलांना जगण्याचं पाठबळ मिळावं हीच सदिच्छा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. किरणताई यांनी होतकरू, गरजू, गरीब महिलांना त्यांच्या पायावर उभे राहण्याकरिता नेहमीच मदत करित राहणार असल्याचा मानस व्यक्त केला.
वाढदिवसावर पैशाची उधळण न करता किरणताईंनी गरजू महिलेला दिला मदतीचा हात
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 10, 2021
Rating:
