सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (१० ऑक्टो.) : रात्री घरात झोपून असलेल्या नऊ वर्षीय बालिकेला विषारी साप चावल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना मेंढोली येथे घडली. मूळचं मारेगाव तालुक्यातील पेंढरी येथील रहिवासी असलेलं कुटुंब कामानिमित्त मेंढोली येथे वास्तव्याला होतं. मुलीचे वडील सालगडी म्हणून कामाला होते. शेत मालकाच्याच घरी ते रहात होते. १० ऑक्टोबरला कुटुंब गाढ झोपेत असतांना रात्री २ वाजता मुलगी किंचाळत झोपेतून उठली. सापाने चावा घेतल्याचे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने रडतच आई वडिलांना सांगितले. त्यांनाही साप जातांना दिसला. त्यांनी लगेच मुलीला वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पण विष शरीरात पसरल्याने मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वर्षा अय्या टेकाम (९) रा. पेंढरी, ह. मु. मेंढोली असे या मृत बालिकेचे नाव आहे. मारेगाव तालुक्यातील पेंढरी या गावातील रहिवासी असलेला अय्या टेकाम हा मेंढोली येथील महेंद्र शामराव खडे या शेतमालका कडे सालगडी म्हणून कामाला होता. तो शेतमालकाच्याच घरी रहायचा. रात्री जेवण केल्यानंतर कुटुंब झोपलेलं असतांना विषारी साप घरात शिरला व त्याने वर्षा टेकाम या नऊ वर्षाच्या बालिकेला दंश केला. सापाने दंश केल्याने मुलगी किंचाळतच झोपेतून उठली. तिला विषारी साप जातांना दिसला. तिने आपल्या आई वडिलांना साप चावल्याचे सांगितले. आई वडिलांनी लगेच तिला वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पण साप विषारी असल्याने विष संपूर्ण शरीरात पसरले, व उपचारादरम्यान या बालिकेचा मृत्यू झाला.
विषारी सापाच्या दंशाने नऊ वर्षीय बालिकेचा मृत्यू
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 10, 2021
Rating:
