माऊली दुर्गोत्सव मंडळातर्फे स्व.शुभम गेडाम, स्व.पिंटू गेडाम,स्व.पृथ्वीराज पेंदोर यांच्या स्मृती प्रित्यर्थ भव्य रक्तदान शिबिर संपन्न

सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (१० ऑक्टो.) : पांढरकवडा स्थानिक आखाडा वॉर्ड परिसरातील माऊली दुर्गोत्सव मंडळातर्फे स्व.शुभम गेडाम, स्व.पिंटू गेडाम,स्व.पृथ्वीराज पेंदोर यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिनांक १० ऑक्टाेंबरला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. राज्यात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी राज्य शासनाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन केले होते. शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत माऊली दुर्गोत्सव मंडळातर्फे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आला होता.

या रक्तदान शिबिराला नगराध्यक्षा सौ. वैशालीताई नहाते, माजी नागराध्यक्ष भाऊराव मरापे सर, आतिष चव्हाण, ऋतिक पाटील यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली. रक्तदान शिबिराचे आयोजनाकरिता भूषण मरापे, संतोष पेंदोर, गौरव गेडाम रवी पदलमवार, शुभम मेश्राम, गणेश कट्टलवार, जगन मडावी, वृषभ करपते, राहुल कात्रजवार, उज्ज्वल तावरे, दादू वातीले, सौरभ राठोड आदी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
माऊली दुर्गोत्सव मंडळातर्फे स्व.शुभम गेडाम, स्व.पिंटू गेडाम,स्व.पृथ्वीराज पेंदोर यांच्या स्मृती प्रित्यर्थ भव्य रक्तदान शिबिर संपन्न माऊली दुर्गोत्सव मंडळातर्फे स्व.शुभम गेडाम, स्व.पिंटू गेडाम,स्व.पृथ्वीराज पेंदोर यांच्या स्मृती प्रित्यर्थ भव्य रक्तदान शिबिर संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on October 10, 2021 Rating: 5
Powered by Blogger.