सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (१० ऑक्टो.) : अखिल भारतीय श्री गुरुदेव महिला व पुरुष सेवा मंडळ चंद्रपूर शहर च्या वतीने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ५३ व्या पुण्यतिथी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे आजीवन सेवक स्व.कृष्णराव हजारे यांचे १७ वे पुण्यस्मरण कार्यक्रम उद्या सोमवार दिनांक ११/१०/२०२१ रोजी आयोजित केलेले आहे. तरी या कार्यक्रमांना चंद्रपूर शहरातील सर्व पदाधिकारी, सदस्य व सर्व गुरुदेव उपासक यांनी उपस्थित राहावे अशी सुचना चंद्रपूरचे अधिवक्ता दत्ता हजारे यांनी एका पत्रकातुन केली आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे:
सकाळी ७.०० वाजता घटस्थापना मुर्ती पुजन आणि सामुदायिक ध्यान
सकाळी ११.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत अखिल भारतीय श्री गुरुदेव महिला व पुरुष भजन मंडळ चंद्रपूर शहर यांच्या भजनाचा कार्यक्रम
तसेच दुपारी ३:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपावेताे ह.भ.प. लक्ष्मणदास काळे महाराज यांचे प्रबोधनात्मक किर्तन तसेच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना श्रध्दांजली व सामुदायिक प्रार्थना आणि महाप्रसादा नंतर या कार्यक्रमाची सांगता हाेणार आहे. उपरोक्त कार्यक्रम ॲड. दत्ताभाऊ हजारे, जिल्हा सेवाधिकारी,
अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ चंद्रपूर जिल्हा तथा महीला व पुरुष सेवा मंडळ चंद्रपूर शहर आणि हजारे परिवार तथा दादाजी नंदनवार,
जिल्हा प्रचार प्रमुख, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ जिल्हा चंद्रपूर यांचे वतीने आयोजित करण्यात आले आहे.
राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज यांची ५३ व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम उद्याला चंद्रपूरात
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 10, 2021
Rating:
