वाघाने तरुण शेतकऱ्याला केले ठार - चिचाेली शेत शिवारातील घटना


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (१० ऑक्टो.) : मूल तालुक्याच्या चिचाेली गावाजवळील शेत शिवारा लगत राजेंद्र नामदेव ठाकरे (४४) रा.चिचोली हा बैल चारण्यासाठी गेला होता. बैल चरत असल्याने झाडाच्या सावलीत राजेंद्र आराम करीत बसला असतांना मागुन वाघाने झडप घालुन त्यास ठार केल्याची घटना आज घडली. मृतक राजेन्द्र यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा व आई असुन घरातील राजेन्द्र कर्ता पुरुष गेल्याने संपूर्ण परिवार हतबल झाला आहे.
Previous Post Next Post