आंदोलक शेतकऱ्यांची निर्मम हत्या करणाऱ्या व क्रूरतेचा कळस गाठणाऱ्या त्या केंद्रीय मंत्र्याला भर चौकात फासावर लटकावे - शेतकरी नेते मनीष भाऊ जाधव
सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
यवतमाळ, (१० ऑक्टो.) : उत्तर प्रदेशातील लखिंमपुर येथे शांततापूर्ण चाललेल्या आंदोलनात शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या अमानुष घटनेचा पुसद येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र शब्दात ''धिक्कार'' करण्यात आला. या प्रकरणी दोषी असलेल्या मंत्री व त्याच्या पुत्राविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली.
यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनिष जाधव यांच्या नेतृत्वात शेतकरी शिष्टमंडळाने व विविध संघटनांनी सहाय्यक जिल्हाधिकारी सावन कुमार यांची शुक्रवारी दिनांक ८ ला भेट घेतली व त्यांना निवेदन सादर करण्यात आले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून उत्तर प्रदेशातील लखिमपुर खेरी येथील शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या माध्यमातून नव्यानेच अस्तित्वात आलेल्या तीन कृषी कायद्याच्या अनुषंगाने हे कायदे शेतकरी विरोधी असून हे कायदे रद्द व्हाव, या मागणीकरिता लोकशाहीच्या मार्गाने अहिंसात्मक पद्धतीने निषेध नोंदवत असताना रस्त्यावरील आंदोलनातील शेतकऱ्यांना अमानुषपणे केंद्रामध्ये मंत्री म्हणून सत्तेत असलेल्या अजय मिश्रा व आशिष मिश्रा या पिता पुत्राने अतिशय निर्घुणपणे सत्तेच्या उन्मादात अविर्भावात गाडी खाली घेऊन या शेतकऱ्यांना चिरडून टाकुन त्यांना ठार केले, ही घटना काळजाची ठाव घेणारी व लोकशाहीला व समाज मनाला सुन्न व काळीमा फासणारी ही घटना कृषिप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांची सोबत अत्यंत क्रूरतेचा कळस गाठणारी, या पिता-पुत्रांना शेतकऱ्यांच्या नरसंहारा करीता जबाबदारी निश्चित करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व त्यांना तातडीने मंत्रिमंडळातून बरखास्त करावं व पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरी देण्यात यावी या घटनेचा अवघ्या जगभरातून निषेध होत आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या उत्तर प्रदेश शासनाचा व तेथील व्यवस्थेचा आम्ही धिक्कार करून जाहीर निषेध करतो ही जगाच्या पोशिंद्याची निर्मम हत्या असून या हत्येला जबाबदार असणाऱ्या प्रशासनातील अधिकारी व सर्व दोषीं व्यक्तीवर कठोर शासन कारवाईची मागणी आम्ही करतो. २० मार्च २०१४ ला आपण शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात आर्णी तालुक्यातील दाभाडी या गावातून ''चाय पे चर्चा'' घेऊन संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना आश्वासनांची खैरात वाटून त्यांची फसवणूक करून मतांचा जोगवा पदरी पाडून सत्तेत आला व आज त्यांचीच आपण घोर निराशा केली आहे. त्याच आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातून निवेदनाच्या माध्यमातून या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो,या घटनेची जलद गतीने न्यायालयीन निवाडा व्हावा व दोषी व्यक्तीवर कठोर कठोर शासन शिक्षा व्हावी. या घटनेचा आणि सबंध महाराष्ट्रातून निषेध करतो, या आशयाचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी व देशाचे गृहमंत्री अमित शहा व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना मनीष भाऊ जाधव यांच्या नेतृत्वात निवेदन करण्यात आले.
यावेळी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते अविनाश पोळकट, संभाजी टेटर, संदीप जाधव, संजय कुंभारे अविनाश राठोड, संजय भाऊ कुंभारे, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा संघटक अविनाश भोजू राठोड, सामाजिक कार्यकर्ते, सांडवा, संदीप भाऊ जाधव (पुसद), निशिकांत राऊत (कासोळ), हिवरी उपस्थित होते.
🙏☘️
आंदोलक शेतकऱ्यांची निर्मम हत्या करणाऱ्या व क्रूरतेचा कळस गाठणाऱ्या त्या केंद्रीय मंत्र्याला भर चौकात फासावर लटकावे - शेतकरी नेते मनीष भाऊ जाधव
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 10, 2021
Rating:
