मार्डी येथील अवैध मटका पट्टीवर मारेगाव पोलिसांची धाड


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (१७ ऑक्टो.) : मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मार्डी येथील एका अवैध,मटका पट्टी घेणाऱ्यास ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई आज रविवार दि.१७ ऑक्टो. २०२१ रोजी दुपार च्या सुमारास करण्यात आली आहे. या धाड दरम्यान, आरोपी सह मटका पट्टी साहित्य जप्त व रोख रक्कम हस्तगत करण्यात आले.

पोलीस सूत्राच्या माहितीनुसार नवरात्री उत्सवाच्या विसर्जन निमित्ताने मार्डी बिट मध्ये पेट्रोलिंग करीत असतांना मार्डी-चोपण रोड वर सुरु असलेल्या मटका पट्टी ची कुणकुण लागताच त्या ठिकाणी धडक देऊन मटका पट्टी घेत असलेल्या आरोपी फिरोज खान सरदार खान पठाण (४८) रा. मार्डी याला टाइम बाजार या खेळावर आकडे घेत असतांना अटक करण्यात आली आहे.

या कारवाई दरम्यान, आकडे लिहिण्याचे साहित्यसह आरोपीकडून पेन कागद व ४८० रुपये असा ऐकूण ४८५ रु.नगदी आढळून आला असून, या प्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम १२ अ नुसार गुन्हा दाखल केला. सदर कार्यवाही ठाणेदार राजेश पूरी, एएसआय जगदीश बोरनारे, पोकॉ सुरेंद्र टोंगे यांनी केली.
मार्डी येथील अवैध मटका पट्टीवर मारेगाव पोलिसांची धाड मार्डी येथील अवैध मटका पट्टीवर मारेगाव पोलिसांची धाड Reviewed by सह्याद्री चौफेर on October 17, 2021 Rating: 5
Powered by Blogger.