सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (१७ ऑक्टो.) : कुठलेली सबळ कारण नसतांना वराेरा तालुक्यातील संपूर्ण काेतवालांचे मागिल महिण्यांचे पगार १५ दिवस लाेटुन सुध्दा महिला तहसीलदार यांनी बुध्दीपुरस्पर दिले नसल्याची काेतवाल संघटनेची तक्रार असुन या बाबतीत त्यांनी वराेरा एसडीओ कार्यालयाचे उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांची प्रत्यक्ष भेंट घेवून त्यांना नुकतेच एक लेखी निवेदन सादर केले असल्याचे वृत्त आहे. एव्हढेच नाही तर या हेकेखाेर व मनमानी कारभार करणां-या महिला तहसीलदारांच्या तक्रारींचा ताेंडी पाढा देखिल वाचला असल्याचे समजते. गत दाेन महिण्यांपासून वराेरा तहसील कार्यालयाला कार्यरत असलेल्या या महिला तहसीलदारच्या हेकेखाेर धाेरणामुळे ऐन दस-यात काेतवालासह पटवारी व मंडळ अधिकारी वर्गांचे पगार हाेवू शकले नाही. विशेष म्हणजे तालुक्यातील ब-याच तहसील कार्यालयाचे पगार दस -याच्या अगाेदरच कर्मचा-यांच्या खात्यात जमा झाल्याचे समजते. मग वराेरा तहसीलदार यांनी कुठल्या सबळ कारणास्तव काेतवाल, पटवारी व मंडळ अधिकारी यांचे पगार जमा केले नाही. या सर्व कर्मचा-यांचे काम असमाधानकारक आहे का ? जर काम असमाधानकारक असल्यास यांना पगार राेखण्यांचा अधिकार आहे का ? या सर्वांचे कामच समाधानकारक नसेल तर त्यांनी विभागीय चाैकशीसारखे प्रस्ताव जिल्हाधिकारी व एसडीओ यांचे कडे आज पावेताे सादर का केले नाही. असे एक नाही तर अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहे. त्यांनी तलाठ्यांना दिलेल्या एका कारणे दाखवा नाेटीस मध्ये एका साज्याला दाेन पटवा-यांची नावे दाखविली आहे. अख्ख्या चंद्रपूर जिल्ह्यात कुठल्याही एका तलाठी साजाला एकाच वेळी दाेन पटवारी कार्यरत असल्याचे कुठेच दिसून येत नाही पण वराे-यात (तलाठ्यांना दिलेल्या) कारणे दाखवा नाेटीस मध्ये एकाच साजावर दाेन पटवारी कार्यरत असल्याचे दिसून येते. या पत्रात केलेली ही घाेडचुक नाही का ?
वराेरा महिला तहसीलदारांनी मानधन तत्वावर काम करणां-या काेतवालांचे पगार राेखले
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 17, 2021
Rating:
