सह्याद्री न्यूज | वासुदेव राठोड
किनवट, (१७ ऑक्टो.) : माहूर-आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक जवळच येऊन ठेपल्याने वानोळा जि.प.गटात चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे. इकडे-तिकडे निवडणूकीचे हलके वारे वाहतांना अनेक जण या वायात आपले कपडे वाळवण्याची तयारी करीत आहे. प्रत्येक पक्षाकडुन अनेक ईच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे. परंतु मतदान राजा कोणाला पसंती देतो हे येणार वेळच ठरवले. प्रत्येक पक्ष आप आपल्या परीने कसे निवडून येता येईल याकडे लक्ष केंद्रित केले आहे. मागील निवडणूकीत काँग्रेस पक्षाने हा गड आपल्या कडे राखत संजय राठोड यांना उमेदवारी देऊन विजय खेचून आणला,परंतु मागील पाच वर्षात विकासाचा अवुशेष भरून निघेल असा विश्वास मतदार राजा बाळगुन होता,परंतु आशेच निराशा झाली असे सुर जनतेतुन ऐकावयास मिळत आहे. परिणामी या वेळेस संजय राठोड यांना निवडून येण्यासाठी मतदाराची मनधरणी करावी लागणार आहे. भारतीय जनता पार्टी हे केंद्रात क्रमांक एकचा पक्ष असून राज्यात या पक्षाची जी परिस्थिती आहे. ठिक हिच परिस्थिती वानोळा जि.प गटात पहावयास मिळत आहे, कारण विघमान आमदार भिमरावजी केराम साहेब हे मागील दोन वर्षात वानोळा गटात गावोगावी कार्यकर्ता भेटी न घेतल्याने कार्यकर्त्यांत नाराजीचे सुर निघत आहे. यामुळे भा.ज.पा. चे ईच्छूक उमेदवारांत विधिज्ञ ॲड रमन जायभाये, धरमसिंग राठोड, सुमित राठोड, दिलीप राठोड या पैकी ज्यांना उमेदवारी मिळेल त्यांना जनतेची मनधरणी करून गॕस दरवाड,पेट्रोल,डिझेल दरवाड यांचा बळी होऊ नये याची काळजी घ्यावी लागणार आहे. आगामी जि.प.व प.स.निवडणूक महाविकास आघाडी स्वबळावर लडणार असे काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी नवरत्रीत रेणुका गडावर जाहिर केले म्हणून शिवसेना सुद्धा वानोळा गटात आपला उमेदवार निवडणूक रिंगणात देणार हे निश्चित आहे, शिवसेनेकडुन सुदर्शन नाईक हे एकमेव उमेदवार दिसत आहे. मागील काळात ज्योतिबा दादा खराटे यांना वानोळा गटात चांगलीच कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली होती परंतु मागील पाच वर्षात ज्योतिबा खराटे यांचा वानोळा गटात जनसंपर्क कमी झाल्याने सेनेचे अनेक कार्यकर्ते ईतर पक्षात प्रवेश करून सेनेत कार्यकर्त्यांची एक पोखली निर्माण केले आहे.हि पोखळी भरून काढण्यासाठी सेनेला अनेक प्रयत्न करावे लागणार आहे.
वानोळा जि.प.गट हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालकिल्ला म्हणून ओळखला जातो, या पक्षात मोठी कार्यकर्त्यांची फळी असून अनेक मतदार हे कट्टर "प्रदिपवादी"आहे. माजी आमदार प्रदिप नाईक यांना माननारा मोठा गट या सर्कल मध्ये आहे. मागील निवडणूकीत वानोळा गटात सौ.कलावती बंडू पाटील भुसारे यांना उमेदवार दिली परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या वेळेस या पक्षाकडुन बंडू पाटील भुसारे हे मागील पराभवाचा कसर काढण्यासाठी उमेदवारी मागीत आहे तसेच कुंदन पाटील पवार पालाईगुडाकर हे सुद्धा निवडणूक रिंगणात उतरण्यास तयार आहे. नाईक साहेबांचे अतिशय निकटवर्तीय प्रकाश पाटील पवार यांचे चिरंजीव आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे ता.सचिव अभिजित दशरथ राठोड हे सुद्धा या पक्षाकडुन उमेदवारी मागत असुन त्यांना या वानोळा सर्कल मध्ये मोठा जनाधार आहे. मोठा राजकीय वारसा त्यांच्या सोबत असून कै.दत्तरामजी राठोड साहेब जे या सर्कलचे जूने राजकीय वारस असून त्यांनी या सर्कल मध्ये 1965 ते 2020 पर्यत अनेक विकास कामे केली आहे. शिक्षणाचे संकुल उभे करून अनेक कुटुंबासाठी शिक्षणाची दारे उघडी केली त्यांचे राजकीय वारस म्हणून अभिजित राठोड यांना वानोळा सर्कल मध्ये निवडून येणे आहे,तरूण तडफदार, मनमिळावू व्यक्तीमत्व म्हणून त्यांना पसंती मिळेल असे बोलले जात आहे. वानोळा हे माहूर तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असुन या ग्रामपंचायतीचे उपसरपंच पद त्यांनी भुसविले आहे. युवकांशी त्यांचा दांडगा संपर्क असुन युवकांची मोठी फळी त्यांच्या सोबत आहे. अभ्यासु ,वकृत्व संपन्न व्यतीमत्व म्हणून तालुक्यात त्याचा परिचय आहे.
मा.आ.नाईक साहेबांचे खंदे समर्थक म्हणून त्यांना ओळखतात. वानोळा गटात युवकांना संधी दिल्यास निश्चितच विजय होईल असे जनतेतुन बोलले जात आहे. तसेच वानोळा गटातून किशोर पाटील पवार मा.प.स सदस्य हे सुद्धा ईच्छूक असून सामाजिक कार्याचा वेड मनात बाळगुण जातपंचायती मार्फत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मोठ्या दिलाचा राजा म्हणून सुद्धा त्यांना लोक संबोधतात त्यांना कोणत्या पक्षाची उमेदवारी मिळेल हे अध्यावत निश्चित नसुन मतदार हा सभ्रमात आहे.
वानोळा जिल्हा परिषद गटात निवडणूकीची रंगीत तालीम
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 17, 2021
Rating:
