मारेगावात अवैध दारुवर पोलिसांची धाड


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (१७ ऑक्टो.) : शहरात सध्या अवैध दारू विक्रेत्यांनी डोके वर काढले असून दुर्गा उत्सव, दसरा, ईद मिलाद यासारख्या सनामध्ये शहरातील अवैध दारू विक्रेत्यांनी दारू विक्रीचा जोर वाढला आहे. नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक राजेश पुरी अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई करण्यात सुरुवात केली आहे.

सध्या दुर्गादेवी विसर्जन असल्याने दारू विक्रीचे दुकान बंद असल्याने या बंदचा पुरेपूर फायदा घेत जुन्या पोस्ट आफिस जवळ चक्क हनुमान मंदिर च्या बाजूला खुलेआम दारूविक्री सुरू होती. यावेळी परिसरातील अवैध दारू विक्री सुरु असल्याची माहिती नागरिकांनी मारेगाव पोलिसांना दिली.

माहितीनुसार जमादार आनंद अलचेवार यांनी अवैध देशी दारूचे २२ शिशा जप्त केले. मात्र, विक्रेता हातावर तुरी देऊन पसार झाला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार आनंद आचलेवार करत आहे.
मारेगावात अवैध दारुवर पोलिसांची धाड मारेगावात अवैध दारुवर पोलिसांची धाड Reviewed by सह्याद्री चौफेर on October 17, 2021 Rating: 5
Powered by Blogger.